सोलापूर- राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान करण्याचा संकल्प करून आज शनिवारी सोलापुरात काँग्रेसकडून संकल्पदिन म्हणून साजरा करण्यात आला. तसेच सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने काँग्रेस भवन येथे शेतकरी विरोधी कृषी बिलाची होळी करण्याच्या प्रयत्न केला गेला. पण पोलिसांनी याला विरोध करत होळी करण्याचे सर्व साहित्य जप्त केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींचा सल्ला ऐकणे गरजेचे होते-
यावेळी बोलताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, सध्याच्या काळात शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदा, व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले असून देशोधडीला लागले आहेत. कोरोनामुळे मोठी हानी होऊ शकते असा इशारा देताना उपाययोजना करा, अशा सूचना राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना केल्या होत्या. परंतु हा जबाबदारीचा सल्ला न ऐकता देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकेकोरपणामुळे मरणाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केला आहे, असा आरोप सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
वीज बिलांची होळी करताना पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट-
काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस भवन येथे आंदोलन करण्यासाठी जमले होते.जेलरोड पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला होता.कृषी बिलांची होळी करण्याचे साहित्य काढताच पोलिस सर्व साहित्य हिसका मारून घेण्याचा प्रयत्न करू लागले. यामधून पोलिसांत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट झाली.
यावेळी मनोज यलगुलवार, संजय हेमगड्डी, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेवक नरसिंग कोळी, नगरसेविका परवीन इनामदार, अरुण साठे, उदय चाकोते, देवा गायकवाड, बाबू म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, अशोक कलशेट्टी, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, पशुपती माशाळ, किसन मेकाले, अंबादास गुत्तीकोंडा, अनिल मस्के, हारून शेख, जेम्स जंगम, युवराज जाधव, अनुपम शहा, परशुराम सतारेवाले, राजेश झंपले, चौबल मनसावाले, मंगल मंगोडेकर, सुमन विटकर, लक्ष्मीनारायण दासरी, लतीफ शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.