ETV Bharat / city

महाविकास आघाडी सरकारमध्ये ताळमेळ नाही - देवेंद्र फडणवीस

आज (मंगळवार) पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हेरिटेज लॉन येथे भाजप पक्षाच्यावतीने बैठक आयोजित केली होती. यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 24, 2020, 3:39 PM IST

सोलापूर - आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची अवस्था काय झाली आहे हे सर्वश्रुत आहे. अनैसर्गिक कृत्य केल्यामुळे काय होते, हे सर्वांना माहिती आहे. कोणाचे पायपूस कुणाच्या पायाखाली नाही. नेत्याचा फोटो लावला नाही म्हणून काँग्रेस कार्यकर्ते गोंधळ करत आहेत. मुळात या तिन्ही पक्षांमध्ये ताळमेळ नाही. गोंधळात गोंधळ अशीच यांची गत झाली असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

आज (मंगळवार) पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हेरिटेज लॉन येथे भाजप पक्षाच्यावतीने बैठक आयोजित केली होती. यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.

  • सामान्यांच्या ज्या समस्या त्याच पदवीधरांच्या समस्या-

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी संवाद करणे गरजेचे आहे. सामान्यांची ज्या अडचणी आहेत, त्याच अडचणी किंवा समस्या शिक्षक व पदवीधारकांच्या आहेत. यातील 70 टक्के हे शेतकरी आहेत. या सरकारने शिक्षकांच्या व विजेच्या संदर्भात अद्यापही निर्णय घेतला नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी भरपूर काम करावे अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

  • राष्ट्रवादीचा उमेदवार कोणाचा आहे त्यांनाच कळत नाही -

महाविकास आघाडी सरकारने पदवीधर मतदारसंघासाठी अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. हा उमेदवार राष्ट्रवादीचा आहे की शिवसेनेचा आहे? हे अद्यापही कुणालाही कळत नाही. केवळ पाट्या टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु, दुसरीकडे भाजपच्यावतीने चांगले उमेदवार देण्यात आले आहेत. हे दोन्ही उमेदवार नक्कीच जिंकणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबद्दल सर्वसामान्य जनतेत मोठ्या प्रमाणात रोष आहे. अतिवृष्टीमध्ये शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळाली नाही. हे सरकार नाकर्ते आहे. वीज वापर न करता सावकारी पद्धतीने जनतेकडून चौपट वीजबिल वसुली केली जात आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

भाजपच्या काळात तिन्ही वीज कंपन्यांचा कारभार उत्तम चालला होता. तसेच स्वस्त दरात वीज खरेदी केली जात होती. या सरकारच्या काळात वीजेच्या प्रश्नाचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोना संदर्भातील रुग्णालये तसेच वैद्यकीय बिलांचे प्रश्न सुटले नाहीत. याचा परिणाम पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत दिसून येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • शिंदेंच्या प्रकरणावरून विरोधकांना टोला -

महाविकास आघाडी सरकारमध्ये ताळमेळ नसून, सोलापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो बॅनरवर न लावल्यामुळे शिंदेचा विसर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडला आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

हेही वाचा - पंतप्रधान मोदी सिरम इंस्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता; कोरोना लसीचा घेणार आढावा

हेही वाचा - पतीच्या स्मरणार्थ पत्नीने बांधला ताजमहाल..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.