सोलापूर - बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी स्थापन केलेली शिवसेना ( Shiv Sena ) अखंड राहिली पाहिजे याच एका ध्येयाने जीवाची बाजी लावून सोलापूर ते मुंबई पायी वारी करण्याचा संकल्प उळे (ता.दक्षिण सोलापूर) येथील प्रती दादा कोंडके ( Dada Kondke ) उत्तम शिंदे यांनी केला आहे. या पायी वारीला आज सकाळी 21 जुलै रोजी नऊ वाजता सोलापूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj ) अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करुन उत्तम शिंदे यांनी पायी वारी सुरू केली आहे. उत्तम शिंदे यांची ही पायी वारी 25 दिवसाची असणार आहे.
शिवसेना अखंड राहिली पाहिजे- राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता माझी शिवसेना दुभंगते की काय अशी एक भावना सर्वसामान्य शिवसैनिकाची झाली आहे. परंतू स्वर्गिय बाळासाहेबांनी कष्टाने उभारलेली हि शिवसेना अखंडच राहिली पाहिजे हि राज्यातील शिवसैनिक नाही तर प्रत्येक सामान्यांचीसुध्दा लोकभावना आहे.
शिवसेना अखंड राहावी यासाठी पायी वारी - दादा कोंडके यांनी जसे शिवसेनेचे स्टार प्रचारक ( Star campaigner of Shiv Sena ) म्हणून काम केले तसेच काम त्यांच्यानंतर उत्तम शिंदे यांनी स्वर्गिय बाळासाहेबांच्या आशिर्वादाने केले आहे. राज्यात विविध निवडणूकावेळी हे काम गेल्या 20 वर्षापासून अव्याहत सुरुच आहे. उत्तम शिंदे लहानपणापासूनच एक शिवसैनिक म्हणूनच काम करतात. राज्यात सर्वदूर प्रचारक म्हणून काम केलेल्या उत्तम शिंदे यांनी कधीच कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. पोटाला चिमटा घेऊन पायाला भिंगरी बांधून हा शिवसैनिक शिवसेनेच्या प्रचार अन प्रसारासाठी धडपडतोय. आताही हि शिवसेना अखंड असावी अशीच एक उदात्त भावना उराशी घेऊन पायी वारी करत असल्याचे उत्तम शिंदे यांनी सांगितले.
25 दिवस पायी प्रवास करणार - साधारण 25 दिवसांची पायी वारी आपण स्वयंस्फूर्तीने प्रामाणिकपणे करणार असल्याचे उत्तम शिंदे सांगतात. सोलापूर ते मुंबई या वाटचालीत "एकला चलो रे" चा नारा घेऊन निघालेल्या या शिवसैनिकास गावोगावच्या शिवसैनिकांचे पाठबळ मिळणार असल्याचा विश्वास उत्तम शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा - President Election Result : राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला 11 वाजता सुरुवात