ETV Bharat / city

Corporators Agitation : सोलापूर महानगरपालिके समोर नगरसेवकांचा ठिय्या; कोरोना नियमावलीचा फज्जा - सोलापुरात विविध मागण्यांसाठी नगरसेवकांचे आंदोलन

विविध पक्षातील नगरसेवकांनी ( Corporators Agitation in Front of the municipality ) पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. हे उपोषण केले जात आहे. असे असले तरी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने ( Solapur Municipal Administration ) कोरोना नियमावली ( Corona Guidelines ) जाहीर केली आहे. सोलापुरात कडक निर्बंध लागू केले असताना नगरसेवकांनी कोरोना नियमावलीचे तीन तेरा करत, गर्दी जमवली असल्याचे पाहायला मिळाले.

आंदोलन करतांना नगरसेवक
आंदोलन करतांना नगरसेवक
author img

By

Published : Nov 30, 2021, 8:00 PM IST

Updated : Nov 30, 2021, 8:23 PM IST

सोलापूर - सोलापूर शहर व हद्दवाढ भागातील गुंठेवारी व प्राथमिक ले-आउट बांधकाम परवाने चालू करण्यासंदर्भातील मागणी घेत विविध पक्षातील नगरसेवकांनी ( Corporators Agitation in Front of the municipality ) पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. हे उपोषण केले जात आहे. असे असले तरी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने ( Solapur Municipal Administration ) कोरोना नियमावली ( Corona Guidelines ) जाहीर केली आहे. सोलापुरात कडक निर्बंध लागू केले असताना नगरसेवकांनी कोरोना नियमावलीचे तीन तेरा करत, गर्दी जमवली असल्याचे पाहायला मिळाले.

आंदोलक नगरसेवक प्रतिक्रिया देतांना

शहर हद्दवाढ भागातील गुंठेवारीसाठी नगरसेवकांचे उपोषण

मागील अनेक वर्षापासून शहर हद्दवाढ भागातील गुंठेवारी आणि ले-आउट पद्धतीने झालेले बांधकामे नियमित करण्याकरिता शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. शिवाय पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये देखील हद्दवाढ भागातील अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या संबंधीचा ठरावास मान्यता देण्यात आली आहे. तरी देखील सोलापूर पालिका आयुक्त राज्य शासन आणि पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. वारंवार मागणी करून देखील पालिका आयुक्त हद्दवाढ भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास तयार नाहीत. शासन आदेशानुसार पालिका आयुक्तांनी हद्दवाढ भागातील बांधकामे नियमित करण्याकरिता आदेश प्रवाहित करावे, असे सांगत नगरसेवकांनी आयुक्ताच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

कोरोना नियमावली पायदळी तुडवली

कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट ओमिक्रोन आला आहे. त्याअनुषंगाने सोलापुरात स्थानिक प्रशासन अलर्ट झाले आहे. लसीकरणावर भर दिला जात आहे आणि नागरिकांसाठी मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे. तरी देखील नगरसेवकांना याचे भान राहिले नाही. उपोषणाला बसलेल्या नगरसेवकांनी मास्क परिधान केला नव्हता. सर्वसामान्य विना मास्क असलेल्या नागरिकांना पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन दंड ठोठावत आहे. मात्र आज (मंगळवारी) नगरसेवकानी उपोषणावेळी मास्कच परिधान केला नव्हता. तसेच गर्दी करून कोरोना नियमावलीचा आदेश भंग केला आहे. आता प्रशासन याकडे बघ्याची भूमिका घेणार का? किंवा गुन्हे दाखल करणार असा सवाल निर्माण केला जात आहे.

सहकारी नगरसेवकांची उपोषणाला पाठ

बाबा मिस्त्री, परवीन इनामदार हे प्रभाग 20 चे नगरसेवक असून त्यांच्या पॅनेलमध्ये चारही नगरसेवक काँग्रेसचे आहेत. मात्र मंगळवारच्या उपोषणाला केवळ परविन इनामदार या उपस्थित होत्या. इतर 2 नगरसेवक हे मात्र दिसले नाहीत. उलट शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे, एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांनी पाठिंबा दिला. काँग्रेस पक्षाचे गटनेते अथवा इतर काँग्रेस पक्षाचे कुणीही दिसले नाहीत.

हेही वाचा - Omicron Corona new Variant : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated : Nov 30, 2021, 8:23 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.