सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात मिळून गुरुवारी 1 हजार 667 कोरोना अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 253 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर 287 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
महानगरपालिका क्षेत्रात एकूण 909 जणांची टेस्ट घेण्यात आली होती. त्यात 106 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 803 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर गुरुवारी सोलापूर शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
बाधित रुग्णांमध्ये 53 पुरुष आणि 53 महिलांचा समावेश आहे. शहरात 48 बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरात बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4 हजार 929 झाली आहे. तर शहरात आतापर्यंत एकूण 356 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी टेस्ट झालेल्या अहवालामधून 180 अहवाल प्रलंबित आहेत.
ग्रामीण भागात 758 अहवाल प्राप्त झाले. यामधून 611 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 147 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच 139 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरुवारी 2 रुग्णांचा मृत्यू झाला.
सोलापुरातील कोरोना परिस्थिती -
- पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या -
शहर - 4929
ग्रामीण - 3459
एकूण - 8388
- मृतांची संख्या -
शहर - 356
ग्रामीण - 98
एकूण - 454