सोलापूर- राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत ( Maharashtra Covid Spread ) आहे. पाहता पाहता तिसऱ्या लाटेकडे राज्य जात असल्याचा चित्र निर्माण झाले आहे. मोठ्या झपाट्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये देखील मागील दहा दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली ( Covid Spread In Solapur ) आहे. बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा धक्कादायक आकडा समोर आला ( New Covid Patients In Solapur ) आहे. सोलापूर शहरांमध्ये तब्बल १३३ कोरोनाचे रुग्ण आढळून आले, यामध्ये ३६ पॉझिटिव्ह रुग्ण हे केवळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर आणि कर्मचारी असल्याची माहिती समोर आली ( Doctors Nurses Found Covid Positive Solapur ) आहे.
सोलापूर शहर अहवाल
सोलापूर शहरात सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने ९३८ जणांची तपासणी केली.त्यामध्ये १३९ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. लागण झालेल्यामध्ये ३६ जण सिव्हील हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स आहेत. सोलापूर शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन ३ रुग्ण बरे झाले आहेत. एकही पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोलापूर शहरातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सद्यस्थितीत ४४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
सोलापूर ग्रामीण अहवाल
सोलापूर ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य प्रशासनाने १२५९ जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये १४२ जणांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मृतांचा आकडा शून्य आहे. ग्रामीण भागात सद्यस्थितीत ४६२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.