ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट : यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार - गणेशोत्सवाला कोरोनाचा फटका

शुक्रवारी संध्याकाळी पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकारी व कर्मचारी, महापालिका अधिकारी व कर्मचारी, सार्वजनिक गणेश मंडळाचे, मध्यवर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये बैठक संपन्न झाली. शनिवारी सकाळी याबाबत अधिकृत परिपत्रक जाहीर करून गणेशोत्सव साजरा करण्याची नियमावली जाहीर करण्यात आली.

solapur
गणेश मूर्ती
author img

By

Published : Aug 15, 2020, 7:44 PM IST

सोलापूर - यंदाचा गणेशोत्सव अत्यन्त साध्या पद्धतीने व मिरवणुकीविना साजरा करा असे आवाहन पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नका व श्रीची आरतीदेखील फक्त 5 ते 10 भक्तांच्या उपस्थितीमध्ये करा, असे आवाहन पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी केले आहे. शुक्रवारी संध्याकाळी पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकारी व कर्मचारी, महापालिका अधिकारी व कर्मचारी, सार्वजनिक गणेश मंडळाचे, मध्यवर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली. शनिवारी सकाळी याबाबत अधिकृत परिपत्रक जाहीर करून गणेशोत्सव साजरा करण्याची नियमावली जाहीर करण्यात आली.

सोलापूर शहरात 12 एप्रिल 2020 पासून कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. रुग्णांची एकूण संख्या 5 हजारांवर गेली आहे. 350 पेक्षा अधिक नागरिकांचा या महामारीत मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूची साखळी रोखण्यासाठी एकमेकांचा संपर्क रोखणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सोलापूर पोलीस आयुक्तालयात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक संपन्न झाली. मध्यवर्ती गणेश मंडळ, मूर्तीकार आदींसोबत चर्चा करून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नियमावली घोषित करण्यात आली आहे.

गर्दी टाळण्यासाठी गणेश मूर्ती दोन ते तीन दिवस अगोदर ऑनलाइन घ्यावी किंवा जेथे गणेश मूर्ती तयार होतात त्याठिकाणी जाऊन खरेदी करावे. कोणालाही मंडप लावून गणेश मूर्ती विक्री करता येणार नाही.

*घरगुती मूर्ती 2 फुटापर्यंत व सार्वजनिक गणेश मूर्ती 4 फुटांची असावी.

*यंदा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी श्रीगणेश मूर्ती स्थापन करता येणार नाही.

*गणेश मंडळांना डॉल्बी बँड पथक, ढोल ताशा, लेझीम पथक यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

*ज्या ठिकाणी गणेश मंदिरे आहेत,कायम मंदिरे आहेत त्या ठिकाणी ही स्थापन करता येणार आहे.

*श्री गणेशाची आरती करण्यासाठी फक्त 5 ते 10 भक्तांना परवानगी असेल. आरती करतानादेखील सामाजिक अंतर राखून करण्यात यावी.

* गणेश मूर्ती विसर्जन कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही.जेथे स्थापन केले आहे, तिथेच विसर्जन करावे. किंवा घरीच गणेश विसर्जन करावे असे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी काढले आहे. पोलीस आयुक्तालयात झालेल्या या बैठकीत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त बापू बांगर, वैशाली कडुकर, एसीपी ताकवले, प्रीती टिपरे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.