ETV Bharat / city

केंद्र सरकारविरोधात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'सिटु'चे धरणे आंदोलन - सेंटर फॉर ट्रेड युनियन सोलापूर आंदोलन

केंद्र सरकारने केलेले कायदे जनता विरोधी आणि कामगार विरोधी आहेत. केंद्र सरकारला महागाईच्या प्रश्नावरदेखील अपयश आले आहे. असे म्हणत सिटुच्यावतीने (Central Trade Unions) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Protest at solapur Collector office) धरणे आंदोलन करण्यात आले.

solapur protest
सिटुचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
author img

By

Published : Mar 28, 2022, 4:58 PM IST

Updated : Mar 28, 2022, 7:39 PM IST

सोलापूर - केंद्र सरकारने केलेले कायदे जनता विरोधी आणि कामगार विरोधी आहेत. केंद्र सरकारला महागाईच्या प्रश्नावरदेखील अपयश आले आहे. केंद्राचे सार्वजनिक उद्योग खासगीकरणाचे धोरण अयोग्य आहे, असे सांगत केंद्रीय कामगार संघटना, माकप, सिटुच्यावतीने (Central Trade Unions Protest) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी यंत्रमाग कामगार, विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम आणि सिटु संघटनेचे राज्य महासचिव ऍड. एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन

कामगाराला वेठबिगार केले : केंद्र सरकारने देशातील 29 कामगार कायद्याचे चार कामगार कायद्यात बदल करून कामगाराला वेठबिगार केले आहे, असे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले. कामगाराला उध्वस्त करण्याचा घाट राज्य आणि केंद्र राज्यकर्ता आहे. म्हणून देशभरात 48 तासांचा संप घोषित केला आहे. सरकारच्या मालकीचे सर्व सार्वजनिक उद्योग विकायला काढले आहेत, अशी जहरी टीका माजी आमदार नरसय्या आडम आणि केंद्र सरकारने आणि राज्य सरकारवर केली आहे.

केंद्र सरकार विरोधात महिलांचा विराट मोर्चा : केंद्र सरकारने केलेल्या जनता विरोधी धोरणे, कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल, सार्वजनिक उद्योग धंद्याचे खाजगीकरण, वाढती महागाई, बेरोजगारी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, कार्पोरेट कंपन्याना कर सवलत या विरोधात जवळपास दोन हजार महिला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित झाल्या होत्या. यावेळी विराट मोर्चाला यशस्वी करण्याचे कार्य अनिल वासम, युसूफ शेख, नलिनी कलबुर्गी, कामिनी आडम,नासीमा शेख आदींनी मेहनत घेतली.

Last Updated : Mar 28, 2022, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.