सोलापूर - जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मोठंमोठया लक्झरी गाड्या वापरल्या.या वाहनांचा सर्व खर्च जिल्हा परिषदेच्या खात्यातून जात आहे. त्यांच्या वर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. शासनाच्या तिजोरीतुन हे पैसे जाऊ नये म्हणून लोकशासन आंदोलन पार्टीतर्फे ( Lokshasan Andolan Party ) जिल्हा परिषदेसमोर ( Zilla Parishad Solapur ) भीक मागून आंदोलन करण्यात आले.आणि ते पैसे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. डेप्युटी सीईओ चंचल पाटील यांना निवेदन देत भीक मध्ये मिळालेली रक्कम देण्याचा प्रयत्न यावेळी केला.
डीसले गुरुजीं प्रमाणे कारवाई व्हावी - भीक मागो आंदोलन कर्त्यांनी बोलताना व निवेदनात दिलेल्या माहितीनुसार ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डीसले वर ज्या प्रमाणे कारवाई होत आहे, त्यांचा 34 महिन्यांचा 17 लाख रुपये वेतन वसूल केला जात आहे, त्याच प्रमाणे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी वापरलेल्या लक्जरी वाहनांचा खर्च त्यांच्या वेतनातून वसूल करण्यात यावा. अशी मागणी करत भीक मागो आंदोलनवेळी करण्यात आले.
अन्यथा आम्ही भीक मागून सीईओच्या वाहनांचा खर्च देऊ - लोकशासन आंदोलन पार्टीच्या पदाधिकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर गुरुवारी 21 जुलै रोजी दुपारी भीक मागो आंदोलन केले. जिल्हा परिषद सीईओ हे लक्जरी गाड्या वापरून त्याचा खर्च स्वतःच्या पगारातून न देता ,जिल्हा परिषदेच्या तिजोरीमधून देत आहेत.असे नेहमीच होत आहे, जर शासनाचा पैसा असाच फुजुल खर्च करत असतील तर त्यांना आम्ही भीक मागून पैसे देऊ असे राजू दिंडोरे यांनी बोलताना सांगितले.
हेही वाचा : ST Bus Accident Solapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे केली जखमींची विचारपूस