सोलापूर - आशा सेविका व गट प्रवर्तक महिलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आयोजित केले होते. पण कोरोनामुळे आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे आशा सेविका आणि गट प्रवर्तक महिलांना दिसताच क्षणी पोलीस ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्याकडे रवाना करत होते. पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आशा सेविका आणि गट प्रवर्तक महिलांनी पोलीस व्हॅनमध्येच आंदोलन सुरू केले. आणि केंद्र सरकारविरुध्द निषेध व्यक्त केला.
आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांच्या मागण्या
आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. आशांना किमान वेतन 18 हजार आणि गट प्रवर्तकांना 21 हजार रुपये वेतन देण्यात यावे. आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांना सामाजिक सुरक्षा लागू करा. कामगारविरोधी चार श्रम संहिता रद्द करा. थकीत असलेले सर्व मानधन वाढीव रकमेसह त्वरित अदा करा. या मागण्यासाठी आशा वर्कर आणि गट प्रवर्तकानीं पोलीस व्हॅनमध्येच आंदोलन केले.
हेही वाचा - गोवा विधानसभा निवडणूक; काँग्रेस आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पितृपक्षानंतर होणार मोठ्या घडामोडी