ETV Bharat / city

सिद्धरामेश्वराच्या यात्रेमधील धार्मिक विधीबाबत उद्या होणार निर्णय - solapur political news

बुधवारी (३० डिसेंबर) सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स करून यात्रेतील धार्मिक विधीबाबतचा निर्णय घेतो, असे राव यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले.

solapur
solapur
author img

By

Published : Dec 29, 2020, 7:43 PM IST

Updated : Dec 29, 2020, 7:57 PM IST

सोलापूर - पुणे येथील विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयात सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या (गड्डा) यात्रेतील महत्त्वाच्या धार्मिक विधी व इतर महत्त्वपूर्ण निर्णयासाठी भेटीत सकारात्मक चर्चा मंगळवारी दुपारी पार पडली. यावेळी शिष्टमंडळात आमदार संजयमामा शिंदे, सोलापूरचे आमदार व मानकरी विजयकुमार देशमुख, यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान, विलास लोकरे मामा, अमित रोडगे, अजित शेडजाळे, सचिन कुलकर्णी आदी या शिष्टमंडळात उपस्थित होते.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार मिटिंग

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून प्राथमिक माहिती घेतली. राव यांनी याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्याकडून राव यांनी प्राथमिक माहिती घेतली आहे. तसेच आज मंगळवारी दुपारी शिष्टमंडळाच्या सोबतच चर्चेदरम्यान यात्रेबद्दल झालेली सविस्तर माहिती जाणून घेतली. बुधवारी (३० डिसेंबर) सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स करून यात्रेतील धार्मिक विधीबाबतचा निर्णय घेतो, असे राव यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले.

शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे नेते

सोलापूर शहरात काँग्रेसचे वर्चस्व असताना माढा येथील राष्ट्रवादीचे आमदार संजयमामा शिंदे हे देखील या प्रकरणात जातीने लक्ष घालत आहेत. आज मंगळवारी राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे संतोष पवार, जुबेर बागवान, भाजपा आमदार विजयकुमार देशमुख आणि मंदिर समितीचे राजशेखर हिरेहब्बू आदी उपस्थित होते. यामुळे शहरातील काँग्रेसच्या वर्चस्वाला राष्ट्रवादीने एक प्रकारे आव्हान दिले आहे.

प्रणिती शिंदेही सिद्धेश्वर महायात्रेच्या परवानगीच्या प्रयत्नात

आजतागायत शहरातील राजकारणात काँग्रेस नेत्यांचा मोठा दबदबा होता. परंतू सिद्धेश्वर महायात्रेच्या परवानगीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दखल घेत राष्ट्रवादीचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे याही महायात्रेसाठी धडपड करत आहेत. स्थानिक पातळीवर पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसोबतदेखील सिद्धेश्वर महायात्रेबद्दल पाठपुरावा करत असल्याची माहिती दिली.

Last Updated : Dec 29, 2020, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.