ETV Bharat / city

रविवारी सोलापुरात कोरोनामुळे 52 जणांचा मृत्यू; 1908 पॉझिटिव्ह

author img

By

Published : May 10, 2021, 11:00 AM IST

सोलापूर शहर आरोग्य प्रशासनाने रविवारी शहरात 1665 नागरिकांची तपासणी केली. यामधून 131 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 81 पुरुष व 50 स्त्रिया आहेत. या सर्व रुग्णांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी दिवसभरात सोलापूर शहरात 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

solapur corona news
कोरोनामुळे 52 जणांचा मृत्यू

सोलापूर- कोरोना विषाणूने शहर आणि जिल्ह्यात थैमान मांडले आहे. रविवारी जिल्ह्यात 1908 नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर चिंतेची बाब म्हणजे गेल्या चोवीस तासात तब्बल 52 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे रविवारी एकूण (शहर आणि जिल्हा) 2625 रुग्णांनी उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

सोलापुरात जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासनाने कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 8 मे पासून 15 मे पर्यंत शहर आणि जिल्ह्यात निर्बंध कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणासही विनाकारण बाहेर पडता येणार नाही, अशा सक्त सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत, अशा परिस्थितीतही ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.

कोरोनामुळे 52 जणांचा मृत्यू
कोरोनामुळे 52 जणांचा मृत्यू

सोलापूर शहरात रविवारी 131 नवे रुग्ण आढळले-

सोलापूर शहर आरोग्य प्रशासनाने रविवारी शहरात 1665 नागरिकांची तपासणी केली. यामधून 131 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 81 पुरुष व 50 स्त्रिया आहेत. या सर्व रुग्णांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी दिवसभरात सोलापूर शहरात 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 ही पुरुष आहेत. सोलापूर शहरात रविवारी पॉझि्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होऊन परत घरी गेलेल्याची संख्या अधिक आहे. शहरातील 287 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

लाट ओसरली नाही, चाचणी घटली-

आरोग्य खात्यातून निवृत्त झालेल्या तज्ज्ञांनी शहर आरोग्य प्रशासनावर टीका केली आहे. शहरात कोरोना चाचण्या कमी होत असल्याने रुग्णसंख्या घटली आहे. मात्र, कोरोना चाचण्या वाढल्यास शहरात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढेल, असे मत तज्ञ आणि नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील घटती कोरोना रुग्ण संख्या म्हणजे दुसरी लाट ओसरली असे नव्हे तर टेस्टिंग कमी होत असल्याने रुग्ण कमी आढळत आहेत.

सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच-

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. रविवारी 9 मे रोजी ग्रामीण भागातील 1777 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 1064 पुरुष तर 713 महिलांचा समावेश आहे. रविवारी बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 2338 आहे. यामध्ये 1478 पुरुष तर 859 महिलांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात उपचार घेत असलेल्या 45 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे. ग्रामीण भागात एकूण 6326 कोरोना अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 4549 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात 328 रुग्ण, माळशिरसमध्ये 347 रुग्ण, माढा 254 रुग्ण, करमाळा 200 रुग्ण, बार्शी 150 रुग्ण, मोहोळ 137 रुग्ण, मंगळवेढा 123 रुग्ण या तालुक्यात रुग्ण वाढले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.