सोलापूर - पोटच्या सोळा महिन्यांच्या बाळावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या बापाला व तिच्या आईला सोलापूर जिल्हा न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. 3 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. आपल्या बाळाचा खून करून सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसने जाताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला होता. फास्ट ट्रॅक न्यायालयाने साक्ष, वैद्यकीय पुरावे या आधारे धोलराम अर्जुनराम बिष्णोई (वय 26), पुनीकुमारी धोलाराम बिष्णोई (वय 20 वर्ष,) दोघे रा. राजस्थान या दोघांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली ( girl abusing and murder case parents sentenced death solapur ) आहे.
ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून - आरोपी धोलाराम व पुनीकुमारी बिष्णोई हे कामानिमित्त राजस्थानहून हैद्राबाद येथे गेले होते. 3 जानेवारी मयत सोळा महिन्याच्या बाळावर धोलाराम बिष्णोई याने आपल्या बाळाला दारू पाजली. तिच्यावर अनैसर्गिक, नैसर्गिक व मौखिक अत्याचार केला. अत्याचार केल्याने बाळ सतत रडत होते. तिचा आवाज बंद करण्यासाठी ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून खून केला. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पती पत्नी हैद्राबाद हुन सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसने आपल्या मूळ गावी निघाले होते.
प्रवाशांना संशय आल्याने पोलिसांना कल्पना दिली - धोलाराम बिष्णोई व पुनीकुमारी बिष्णोई हे दोघे सोळा वर्षाच्या बाळाचे मृतदेह घेऊन रेल्वेने हैदराबादहुन निघाले होते. पण, हैदराबादहुन बाळ रडत नाही, हालचाल करत नाही याबाबत संशय आल्याने सहप्रवाशांनी ताबडतोब रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांना ही बाब कळताच सोलापूर रेल्वे स्थानकावर 4 जानेवारी 2022 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला. बाळाची तपासणी केली असता सोळा महिन्यांचे बाळ मयत झाले असल्याचे निदर्शनास आले. त्याचे शवविच्छेदन केले असता त्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले असल्याचं डॉक्टरांनी अहवाल दिला. यानुसार धोलाराम बिष्णोई व त्याच्या या कृत्यात सहकार्य केल्याबद्दल पुनीकुमारी बिष्णोई यावर खून, लैंगिक अत्याचार (बलात्कार), पॉस्को अंतर्गत लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्यात एकूण 31 साक्षीदारांची तपासणी - आरोपींचा अपराध न्यायालयात सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने 31 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, तसेच डीएनए अहवाल या आधारित जिल्हा सरकारी वकील अँड. प्रदीपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही आरोपींचे जबाब नोंदवून घेत त्यांना दोषी धरले होते.
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला - सदर खटल्याची सुनावणी 26 एप्रिल 2022 पासून न्यायालयात सुरू झाली आणि 6 मे रोजी संपली. या सहा दिवसांत 31 साक्षीदार तपासण्यात आले आणि संपूर्ण खटला न्यायालयासमोर सादर करण्यात आला. सदर खटल्यात हैदराबाद, सिकंदराबाद, सोलापूर, राजस्थान, नेपाळ हुन ऑनलाइन साक्षी दिल्या. वैद्यकीय पुरावा, साक्षी, आणि डीएनए अहवाल हे सर्व पुरावे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एल.जोशी यांनी आरोपी धोलाराम बिष्णोई व पुनीकुमारी बिष्णोई या माता पित्यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने वकील प्रदीपसिंग राजपूत, आरोपीच्या वतीने वकील संदीप शिंदे, वकील फिरोज शेख, वकील अंजली बाबरे यांनी काम पाहिले.
हेही वाचा - साकीनाका बलात्कार प्रकरणावर न्यायालयाचा मोठा निर्णय; आरोपीला फाशीची शिक्षा