पुणे- मराठी लेखक, संशोधक, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे ( writer researcher Dr Ramchandra Dekhane ) आज येथे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. सायंकाळी घरी पूजा करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उद्या ( मंगळवारी ) सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात ( Ramchandra Dekhane passes away) येणार आहेत.
डॉ. रामचंद्र अनंत देखणे (जन्म : एप्रिल १९५६) हे मराठी लेखक, संशोधक, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक , व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार आहेत. रामचंद्र देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे रहात आणि खड्या आवाजात अभंगातली चरणे म्हणत. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या कला प्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी, दिंडी सोहळ्यात रामचंद्र देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले.
बालपणापासून संतसाहित्याची होती गोडीरामचंद्र देखणे हे जरी भारुडांत रंगून जात त्तरी त्यांच्या अर्थाकडे त्यांचे लक्ष नसे. आई जेव्हा भारुडातील ’दादला नको गं बाई’ किंवा, ’नणदेचं कार्टं किरकिर करतंय’ आदी प्रतीकांचा अर्थ विचारू लागली तेव्हा त्यांनी भारुडांवर संशोधन करायला सुरुवात केली. ’भारुड वाङमयातील तत्त्वज्ञान - संत एकनाथांच्या संदर्भातल्या या त्यांच्या प्रबंधास इ.स. १९८५मध्ये पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. या प्रबंधाला डॉ. मु.श्री. कानडे पुरस्कार समितीचा १० हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.
२ हजारांहून अधिक भारुडाचे कार्यक्रम डॉ. रामचंद्र देखणे हे उत्तम वक्ते होते. त्यांनी गेल्या काही वर्षांत विविध विषयांवरती अनेक व्याख्याने दिली आहेत. देशविदेशांत त्यांनी केलेल्या २१००व्या भारुडाचा कार्यक्रम १४ मे २०१६ रोजी झाला. रामचंद्र देखणे हे पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. ३४ वर्षांच्या नोकरीनंतर ते ३०-४-२०१४ रोजी निवृत्त झाले. २३-२४ ऑक्टोबर २००४ या दरम्यान राळेगण सिद्धी येथे झालेल्या ग्रामजागर साहित्य संंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
सांस्कृतिक कार्यक्रमात मोलाचे योगदानकिर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ११ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे झालेल्या १२व्या "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमलना'चे अध्यक्षपद भूषविले. अमेरिकेत झालेल्या विश्व साहित्य संमेलनातील "संतसाहित्य आणि आधुनिकता' या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र देखणे होते. सासवडच्या मराठी साहित्य संमेलनप्रसंगी (जानेवारी २०१४) ‘प्रश्न आजचे उत्तरे संतांची’ या विषयावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदी रामचंद्र देखणे होते. कडोली साहित्य संघाच्या माचीगड येथे २७-१२-२०१०ला झालेल्या १३व्या कडोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. संमेलनपूर्व संमेलनात रामचंद्र देखणे यांचा "साहित्यातील लोकरंग' हा कार्यक्रम झाला होता.