पुणे : 10 ऑक्टोंबर हा दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे ( World Health Organization ) जागतिक मानसिक आरोग्य दिन ( World Mental Health Day ) म्हणून साजरा केला जातो. आपल्या आरोग्यामध्ये शारीरिक, सामाजिक, मानसिक, आरोग्य या तीन गोष्टींचा समावेश आहे. शारारिक आरोग्याला जेवढे महत्त्व दिले जाते. तेवढे मानसिक आरोग्याला महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे परिस्थिती अशी आहे की भारतासारख्या देशात सुद्धा मानसिक आजारी असणे म्हणजे वेड असणे असे समजले जाते. अनेक मानसिक रूग्ण असलेले लोक त्यासाठी पुढे येत नाही. मनामध्ये त्यांच्या एक भीती आहे. नातेवाईकही त्याकडे दुर्लक्ष करत असतात. हे कमी व्हायला हवे. कारण मानसिक रोगांमध्ये असे अनेक रोग लवकर उपचार केले की लगेच बरे होतात.
ताणतणावामधून वाढतात मानसिक आजार : 2019 पूर्वी करोना साथी अगोदर साडेआठ कोटी लोकांना मानसिक आजार होता असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले आहे, कोरोना काळात लोकांच्या मध्ये ताणतणाव निर्माण झाले. त्यामुळे साधारणपणे 25 टक्के मानसिक रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये येणाऱ्या अनेक आजाराच्या साथी, होणारे युद्ध, आर्थिक आणि सामाजिक प्रश्न यामुळे मानसिक रोगाचे प्रमाण वाढत आहे. ताणतणावामधून चिंता आणि निराशा असे मानसिक आजार वाढतात. त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर या गोष्टी त्रासदायक होऊ शकतात आणि याचं रूपांतर गंभीर मानसिक आजारामध्ये होऊ शकतो.
दिवस साजरा करण्याचे खरे कारण : जगामध्ये आज मानसिक रोगाचे प्रमाण जर जास्त असले, तर मानसिक रोगांवर उपचार करणारे डॉक्टर जगामध्ये सर्वच देशांमध्ये फार कमी आहेत. वैयक्तिक स्वरूपात लोकांनी आपल्या मानसिक आरोग्याला महत्त्व द्यावं ताणतणावाकडे दुर्लक्ष करू नये आणि वेळीच उपचार घ्यावे. उपचार करणारे डॉक्टर वाढवेत आणि मानसिक रोगांना चांगला आरोग्य मिळावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
मानसिक आजारामध्ये आर्थिक आणि सामाजिक प्रश्न खूप महत्त्वाचे : तणावाचे आपल्याला नियोजन करावे लागेल. त्याचबरोबर आपण काही निर्णय घेतो. विश्लेषण करतो ते साधक वादक असते. त्याचबरोबर शालेय जीवनापासून अगदी लहान मुलांपासून सत्तर वर्षांच्या वृध्दांपर्यंत ताणतणाव असतात. ते सहन करण्याचे, त्यातून मार्ग काढण्याचे नियोजन जे आहे ते आपल्याला करावे लागेल. अगदी शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना दप्तरांचे वोझे होते ते सुद्धा जास्त होतं. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात त्याचे नित्यनेमाने पालन केले तर मात्र आपल्याला यातून सावरता येईल मानसिक रोगातून सुटका होईल. मानसिक आजारामध्ये आर्थिक आणि सामाजिक प्रश्न खूप महत्त्वाचे असतात.
तणावाचे नियोजन करणे गरजेचे : आजच्या धकाधकीच्या जीवनात युवक, आई-वडील, विद्यार्थी असतील या सर्वांनाच फार मोठा स्पर्धेच्या युगात ताण येत आहे. ते नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षा आहेत. आई-वडिलांना नोकरी आहे. नोकरी मधे स्थिरता टिकवण्याचे ताण आहे. घराचा ताण आहे. अशा अनेक ताणतणावांमधून आपण रोज जात असतो. परंतु त्यातून जे मानसिक रोग होतात त्यावर लवकर उपचार घेणे गरजेचे असत. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन असल्यामुळे या सर्वांचं नियोजन आपण केलं पाहिजे. त्यातून आपल्याला जास्त मोठे मानसिक आजार होणार नाहीत आणि जेवढं लवकरात लवकर आपण मानसिक उपचार करणारे डॉक्टरांकडे जाऊ तेवढे लवकर बरे होऊ त्यासाठी हा दिवस साजरा करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात मानसोपचार तज्ञ वाढणे गरजेचे : महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतात. त्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक दोन्ही नियोजन आहे. त्यासाठी सरकार मोठे काम करत आहे. परंतु यासाठी सुद्धा मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये मानसिक उपचार करणारे जे मुख्य हॉस्पिटल आहेत ते ठाण्याला, पुण्याला, जालन्याला होत आहे. ज्या प्रमाणात रुग्ण आहेत त्या प्रमाणात आरोग्य सेवा देण्यास या क्षेत्रात आरोग्य अधिकारी किंवा डॉक्टर्स नाहीत. त्याचबरोबर पुरेशा प्रमाणात जे आवश्यक आहे त्या सुविधाही आपल्याकडे निर्माण होणे गरजेचे आहे. जे प्रायव्हेट डॉक्टर आहेत ते हातावर मोजण्या इतके आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेही तेवढ्या सुविधा नाहीत. जेवढे आवश्यक आहेत .कारण मानसिक रोगांना थोडे दिवस उपचार करून थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासाठी दुसरीकडे ठेवावे लागते. त्याची सुविधा बघता आपल्याला या क्षेत्रात खुप प्रगती करावी लागेल आणि तसा प्रयत्न सरकारने केला पाहिजे.