ETV Bharat / city

Nirmala sitharaman on MVA: केंद्राचे चार मोठे प्रकल्प मविआने राज्यात का येऊ दिले नाहीत? - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

महाराष्ट्रातून वेदांता- फॉक्सकॉन (vedanta foxconn project) एक प्रकल्प गेला म्हणुन आरडाओरडा करणाऱ्या विरोधकांनी केंद्राचे चार मोठे प्रकल्प राज्यात का येऊ दिले नाहीत? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (finance minister nirmala sitharaman) यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या औद्योगिक नुकसानास (Industrial loss of Maharashtra) जबाबदार आहे. अस त्या म्हणाल्या.

nirmala sitharaman
निर्मला सीतारामन
author img

By

Published : Sep 24, 2022, 10:42 PM IST

पुणे महाराष्ट्रातून वेदांता- फॉक्सकॉन (vedanta foxconn project) एक प्रकल्प गेला म्हणुन आरडाओरडा करणाऱ्या विरोधकांनी केंद्राचे चार मोठे प्रकल्प राज्यात का येऊ दिले नाहीत? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (finance minister nirmala sitharaman) यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या औद्योगिक नुकसानास (Industrial loss of Maharashtra) जबाबदार आहे. अस त्या म्हणाल्या. निर्मला सीतारामण पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी नाणार प्रकल्पावर बोट ठेवलं.

नाणार प्रकल्प कोणी थांबवला? नाणार सारखा (Nanar Project) प्रकल्प जी आशियामध्ये सर्वात मोठी ऑईल रिफायनरी होणार होती. त्याला कोणी थांबवलं. तसेच आरे मेट्रो कारशेडसारख्या प्रकल्पाला कोणी थांबवलं. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कोणी थांबवला. या प्रकल्पाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाईल, म्हणून हे प्रकल्प थांबवण्यात आले.

शरद पवार निशाण्यावर- यावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी शरद पवार (sitharaman criticizes sharad pawar) यांना टोला लगावत म्हटलं की, सहकार क्षेत्राचं (Cooperative Sectors) वेगळं मंत्रालय बनविण्यासाठी कोणी प्रयत्न केला नाही. सहकार क्षेत्रासाठी वेगळं मंत्रालय जर बनविल असेल तर ते फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनवलं. राज्यात मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्र असून सहकार क्षेत्र राजकीय करू नये असे सांगणाऱ्या लोकांनी आजपर्यंत कोणतेही सहकार मंत्रालय बनविले नाही. अशी टीका देखील यावेळी सीतारामण यांनी केली.

सध्या देशात डॉलरच्या तुलनेत रूपया घटतोय. याबाबत सीतारामण यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, भारताची करन्सीवर चांगली पकड आहे. बाकीच्या देशांच्या चलनांच्या तुलनेत रुपयाने डॉलरच्या तुलनेत चांगली पकड घेतली आहे. अर्थमंत्रालय या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. असदेखील यावेळी सीतारामण म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.