ETV Bharat / city

MPSC Exam 2021 : आता काय उपयोग! स्वप्नील लोणकरचे एमपीएससीच्या अंतिम यादीत आले नाव - स्वप्निल लोणकरची आत्महत्या

परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्याने व नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने काही महिन्यांपुर्वी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर सरकारला जाग आली. यावर विधानसभेत चर्चा झाली. मात्र, सहा महिने एमपीएससीला जाग आली नाही. आत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एमपीएससीच्या अंतिम यादीत स्वप्निल लोणकरचे नाव आले आहे. या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्वप्नील लोणकर (मृत)
स्वप्नील लोणकर (मृत)
author img

By

Published : Dec 15, 2021, 9:51 AM IST

पुणे - एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर (Swapnil Lonakar suicide) या तरुणाने 29 जूनला आत्महत्या केली. स्वप्नीलने नैराश्यातून आत्महत्या केली होती. या घटनेला आता 6 महिने उलटल्यानंतर (Maharashtra Public Service Commission) एमपीएससीच्या मुलाखतीच्या यादीत स्वप्नीलचे नाव आले आहे. हे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (2019)च्या मुलाखतीसाठीच्या यादीत त्याचे नाव आले आहे. (Maharashtra Engineering Service Examination 2021) आता स्वप्निलचा जिव गेल्यानंतर या नाव येण्याचा या उपयोग अशी प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच, विद्यार्थ्यांचा जी घेतल्यानंतर एमपीएससीला जा आली काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

आता काय उपयोग! स्वप्नील लोणकरचे एमपीएससीच्या अंतिम यादीत आले नाव

आत्ता काय फायदा?

परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्याने व नोकरी मिळत नसल्याने स्वप्नीलने आत्महत्या केली होती. (MPSC Exam 2021) ज्या कारणासाठी त्याने आत्महत्या केली त्या मुलाखतीच्या यादीत त्याचे नाव आले खरे मात्र मुलाखतीला जाण्यासाठी स्वप्नील नसणार! त्यामुळे ज्या मेहनतीने त्याने या स्पर्धा परीक्षांची तयारी केली, परीक्षा उत्तीर्णही झाला. (Maharashtra Engineering Service Examination) मात्र, मुलाखत होत नसल्याने व नोकरी नसल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नीलचे मुलाखत यादीत नाव येऊनही त्याला व त्याच्या कुटुंबियांना काय फायदा झाला? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

स्वप्नीलने टोकाचं पाऊल का उचललं?

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेले कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. (Maharashtra Public Service Commission Examination 2021) पासआऊट होऊन दोन वर्ष झाली आहेत. 24 वय संपत आले आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे काहीच उरलेलं नाही. यास कोणत्याही व्यक्ती कारणीभूत नसून हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मला माफ करा. असं स्वप्नीलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली. पुण्यात त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने एक पत्र लिहिले होते. ज्यात परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्याने होत असलेल्या वेदनांना वाट मोकळी करुन दिली. इतकं टोकाचं पाऊल का टाकावे लागलं याची व्यथा मांडत स्वप्नीलने गळ्याला फास लावून घेतला. अखेरच्या काही तासांत त्याच्या मनात काय सुरू होतं याची उत्तरं त्याने पत्रातून दिली आहेत.

दोन-दोन वर्ष मुलाखती होत नसल्याने तरुणांमध्ये निराशा' - फडणवीस

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून स्वप्नील सुनील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सध्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कार्यप्रणाली पाहता त्याचे पुनरावलोकन होणे गरजेचे आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात अनेक जागा रिक्त आहेत. मात्र त्या जागा अद्यापही भरल्या गेलेल्या नाहीत असेही त्यांनी सांगितले होते. राज्यातले तरूण मोठ्या आशेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असतात. मात्र दोन-दोन वर्ष मुलाखती होत नसल्याने तरुणांमध्ये निराशा येत असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली होती.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : लीना नायर यांचा कोल्हापूर ते 'शनैल'च्या सीईओपर्यंतचा प्रवास..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.