पुणे - राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर असलेला चक्रिय चक्रवात आता उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि लगतच्या भागाकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात ही हवामान परिस्थीती निर्माण झाली आहे.
6 आणि 7 मेला अवकाळी पावसाची शक्यता
गेल्या चोवीस तासात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा आणि गारांचा पाऊस देखील काही ठिकाणी झाल्याचे दिसून आले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासात कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 मे दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर 6 आणि 7 मेला पुन्हा राज्यात पावसाळी वातावरण अनुभवायला मिळेल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हेही वाचा - समीर भुजबळ तुरुंगात असताना चंद्रकात पाटलांना भेटले कसे? भुजबळांचे चंद्रकात पाटलांना प्रत्यूत्तर