पुणे - ''आपके उमर के हजारो लडके हमारे एरिया मे गिऱ्हाईक बन के आते है, अच्छा लगा आज कोई भाई बन के भी आया'', ही आहे समाजातील एका वचिंत आणि दुर्लक्षित समाज घटकातील महिलेची स्वाभाविक प्रतिक्रिया. बहिण भावाच्या नात्याचे अनोखे बंधन म्हणजे भाऊबीज. अनेक संस्था वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भाऊबीज साजरी करुन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही देत असतात. पण ही भाऊबीज काहीशी वेगळी होती. त्या गल्लीतून सामान्य माणूस चुकूनही जाण्याचा प्रयत्न करत नाही. अशा ठिकाणी वंदेमातरम संघटनेतर्फे काही युवक भाऊ म्हणून मुद्दाम गेले. बुधवार पेठेतील देवदासी महिलांसोबत त्यांनी भाऊबीज साजरी केली...
हेही वाचा -गोंदिया: शेतशिवारात लावलेल्या वीज तारांचा शॉक लागून वाघाचा मृत्यू ?
वंदेमातरम संघटना आणि वीर हनुमान मित्र मंडळ वतीने बुधवार पेठ परिसरातील देवदासी महिलांसोबत भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवदासी महिलांना आपल्या विषयीही कोणाला काही तरी वाटत आहे, हे समजल्याने त्या भांबावून गेल्या होत्या. अनेक वर्षे देहविक्री व्यवसाय करणाऱ्या या महिलांशी कोणी नाते ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. काम झाल की प्रत्येक जण आपला रस्ता पकडतो. अशावेळी आलेल्या या युवकांना ओवाळताना काही महिला भावनावश झाल्या होत्या. या युवकांनी त्यांना भेटवस्तू दिल्या. त्याचबरोबर लाख मोलाचा भावनिक आधार देत आम्ही आपल्या पाठीशी उभे असल्याची जाणीव करुन दिली.
हेही वाचा -उघडले देवाचे द्वार! पाडव्याच्या मुहूर्तावर उघडली राज्यातील प्रार्थनास्थळे...
उपक्रमाचे यंदा १६ वे वर्ष
वंदे मातरम संघटनेतर्फे गेली १६ वर्ष बुधवार पेठेतील या देवदासी महिलांबरोबर भाऊबीज साजरी करण्यात येत आहे.या महिला हे देवाच्या दासी आहे. समाजाचं या महिलांकडे बघण्याचं दृष्टीकोन वेगळा असतो.या महिलांनाही मूळ प्रवाहात येण्याचा अधिकार आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात कोणीच असप्रुष्य नाही हा संदेश आम्ही देत असतो अस मत यावेळी वंदे मातरम संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे यांनी व्यक्त केलं