पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात संचारबंदी कायदा लागू करण्यात येऊन घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्यानंतर शहरी भागातील नागरिक आपल्या मुळ गावीत जात आहेत. मात्र, सध्या कोरोनाच्या भितीपोटी शिरुर तालुक्यातील जांबुत गावात आपल्याच लोकांनी आता आपल्याच लोकांसाठी गावबंदी करत गावात येणारे रस्ते जेसीबीच्या साहाय्याने खोदून बंद केला आहे.
शहरी भागात कोरोनाचे रुग्न आढळून येत असल्याची भावना मनात ठेवून ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. शहरी नागरिकांना गावात येण्यास मनाई करण्यात आली असुन जांबुत गावात गावबंदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या धास्तीने शहरी नागरिक मुळगावी येत आहेत. त्यांना गावबंदीमुळे पुन्हा शहराकडे परतावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी लागू असल्याने नागरिकांनी आहे, त्याठिकाणी घरात बसून बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.