पुणे : आपल्या मागण्या पुर्ण करुन घेण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या मार्गाने (unique youth movement in Pune) आंदोलन करीत असतात. याचाच एक प्रत्यय पुणे येथे आला. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी आपल्या मित्रांसह घरी जायला निघाला होता. यासाठी त्याला रेल्वे गाडी पकडायची होती. मात्र दिवाळीच्या सणाची खरेदी करण्यास सगळेच बाहेर पडल्याने, रस्त्यावर प्रचंड वर्दळ होती. आणि त्यातही वाहतुक पोलिसांनी त्या युवकाला अडवले. अनेक विनवण्या करुनही पोलिसांनी न सोडल्याने अखेरीस त्या मुलाची गाडी सुटली. आणि जे नको व्हायला (train was stopped police youth started studying on the road) तेच झाले.
पुणे शहरात सध्या सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू असल्याने; पुणे शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. ट्रॅफिक पोलिसांकडून चौका चौकात चौकशी देखील केली जात आहे. असाच एका चौकशीचा फटका पुण्यातील एका युवकाला बसला आणि त्या पठ्ठ्याने चक्क रस्त्यावर झोपून आंदोलन सुरू केले आहे. ट्राफिक पोलिसांकडून त्या युवकाला अडवण्यात आले आणि त्यावेळेसच त्या युवकाकडून पोलिसांना विनंती करण्यात आली की, माझी आता ट्रेन आहे मला जाऊद्या मी ऑनलाईन चालान भरेल. पण ट्राफिक पोलिसांनी या युवकाला वेळेवर जाऊ न दिल्याने, त्या युवकांची ट्रेन चुकली. या सर्व प्रकारामुळे वैतागलेल्या त्या युवकाने चक्क रस्त्यावरच झोपून आंदोलन सुरू केले आहे.
स्पर्धा परिक्षेचा ताण आणि घराबाहेर राहुन सहन कराव्या लागणाऱ्या यातना यामुळे आधीच विद्यार्थ्यांच्या नाकीनाऊ आलेले असते. त्यातही प्रशासनाचा जाच झाल्याने आणि घरी जाण्याच्या आनंदावर विरर्जन पडल्याने, या मुलाने चक्क रस्त्यावरच अभ्यास सुरु केला.