पुणे पुण्यातील ढोल ताशा पथकांतील १७५ भगव्या ध्वजधारकांची अनोखी मानवंदना Tribute to the saffron flag bearers दिली. ढोल ताशा महासंघ, Dhol Tasha Federation महाराष्ट्रच्यावतीने कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त Amrit Mahotsav of Indian Independence आयोजन पुणे ढोल-ताशांच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात पुण्यातील २५ हजारांहून अधिक युवक-युवती एकत्र येतात. यंदा देखील कोविड संकटानंतर दोन वर्षांनी एकत्र आलेल्या वादकांपैकी १७५ भगव्या ध्वजधारकांनी ढोल ताशांच्या तालावर ध्वज नाचवित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त Amrit Mahotsav of Indian Independence अनोखी मानवंदना दिली.
एकत्रित ध्वज प्रशिक्षण ढोल ताशा महासंघ Dhol Tasha Federation महाराष्ट्रतर्फे बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर संजय सातपुते अनुप साठे आदी उपस्थित होते. भारत माता प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रणी फडकती लाखो झेंडे. या गीताचे समूहगान करीत वादकांनी स्वातंत्र्याचा जयजयकार देखील केला. भगवे ध्वज नाचवित असताना भारत माता की जय... वंदे मातरम्... च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यानिमित्ताने पुण्यातील विविध पथकांतील ध्वजधारकांचे एकत्रित ध्वज प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देखील पार पडले.
मर्दानी खेळांचे सादरीकरण ढोल-ताशा पथकाच्या Dhol Tasha Squad अग्रभागी ध्वज पथक असते. ध्वजाचे अनन्यसाधारण महत्व आहे. ढोल-ताशा पथकातील प्रत्येक वादक ध्वजाला वंदन करुनच वादनाला प्रारंभ करतो. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तिरंगी ध्वजा सह भगव्या ध्वजाचे महत्व व इतिहास देखील वादकांना समजावा, याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अस यावेळी पराग ठाकूर म्हणाले. यावेळी मर्दानी खेळांचे सादरीकरण देखील झाले.