पुणे - जर कधी तुम्ही शहा यांच्या घरी गेलात तर शहा यांच्या मागे एक कठोर व्यक्तिमत्त्व दिसते. त्यांच्या घरी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि चाणक्य यांच्या प्रतिमा लावलेले दिसतात. लोकतांत्रिक परंपरा कशी निर्माण करायची हे चाणक्यांचे वैशिष्ट होते हे शहा यांनी अंगिकारण्याचा प्रयत्न केला असे स्मृती इराणी यांनी नमूद केले. आपण मशीन नसून मिशन आहोत असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेहमी सांगतात.आपण एक वीट असून त्यांनी संघटनेचा किल्ला बनवला आणि मजबूत केला आहे, त्यांचे हे कौशल्य शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले. अमित शहा आणि भाजपाची वाटचाल या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन स्मृती इराणी यांच्या हस्ते झाले.
हे पुस्तक एका व्यक्तीची जीवन कथा - अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन दरम्यान त्या बोलत होत्या हे पुस्तक एका व्यक्तीची जीवन कथा आहे. ज्याला कोणीच पूर्ण ओळखत नाही. शहा यांनी संपूर्ण राष्ट्राचा साठ वेळा प्रवास केला आहे. अगदी गल्लीबोळातून त्यांनी हा प्रवास केला आहे. त्यांचे पहिले घर म्हणजे रेल्वे दुसरे संघ शिबिर आणि तिसरे घर म्हणजे संघ कार्यकर्त्यांचे घर असे ते सांगतात. चौथे घर कोणते जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा असेच स्मृती इराणी यांनी सांगितले.
भाजपचा विस्तार मोदी शहा यांनी केला. आपल्या जे करायचे आहे ते झोपेतही शहा विसरत नाही, असे सांगून 370 कलम रद्द कसे केले गेले याचा प्रवास आपल्याला शहा यांनी सांगितले, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील शहराध्यक्ष जगदीश मुळीक खासदार गिरीश बापट प्रदेश संघटनमंत्री श्रीकांत भारतीय आमदार माधुरी मिसाळ सुनील कांबळे सिद्धार्थ शिरोळे श्वेता महाले माजी महापौर मुरलीधर मोहोळ माजी सभागृहनेते गणेश बिडकर माजी खासदार प्रदीप रावत मूळ हिंदी पुस्तकाचे लेखक आदी उपस्थित होते
पक्ष सांगेल तेथे लढण्याची तयारी - लढण्याची कार्यकर्त्यांची तयारी हवी. पक्षाने त्यांना अमेठीतून लढण्याचे सांगितले त्या तेथून लढल्या, असे सांगताना परिषद प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पक्षाने पुण्यातून देण्याचे आदेश दिले आणि ते यशस्वी झाले. वीस-पंचवीस जागा जास्त जिंकायच्या असतील तर पक्ष सांगेल तेथे लढण्याची तयारी दर्शवली पाहिजे असेही पाटील म्हणाले.