ETV Bharat / city

Two Arrested With Drugs : पुण्यात 17 लाख 75 हजारांचे अमली पदार्थ जप्त, दोघे अटकेत - Pune Police

पुणे पोलिसांच्या ( Pune Police ) अमली पदार्थ विरोधी पथक विभागाने पुणे रेल्वे स्थानक ( Pune Railway Station ) परिसरातून तब्बल 17 लाख 85 हजार 200 रुपये किंमतीचे मेफेड्रॉन ( Drugs ) जप्त केले आहे. हे मेफेड्रॉन घेऊन आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक ( Two Arrested With Drugs) केली आहे. आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना 24 डिसेंबपर्यंतची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

अटक आरोपी व पोलीस पथक
अटक आरोपी व पोलीस पथक
author img

By

Published : Dec 22, 2021, 7:16 PM IST

पुणे - पुणे पोलिसांच्या ( Pune Police ) अमली पदार्थ विरोधी पथक विभागाने पुणे रेल्वे स्थानक ( Pune Railway Station ) परिसरातून तब्बल 17 लाख 85 हजार 200 रुपये किंमतीचे मेफेड्रॉन ( Drugs ) जप्त केले आहे. हे मेफेड्रॉन घेऊन आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक ( Two Arrested With Drugs ) केली असून सलिम मुबारक शेख ( वय 33 वर्षे ) आणि विजय विनोद डेडवालकर ( वय 37 वर्षे), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या घटनेबाबत अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड म्हणाले, अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांसह बंडगार्डन पोलीस ठाणे ( BundGarden Police Station ) हद्दीत गस्त घालत असताना पथकाला पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील तुकाराम शेठ शिंदे वाहनतळाजवळ दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या दुचाकीवर असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 17 लाख 85 हजार 200 रुपयांचा अमली पदार्थाचा मोठा साठा सापडला. त्याशिवाय त्यांच्याकडून एक दुचाकी, वजन काटा, रिकाम्या पिशव्या आणि मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करत आहेत.

24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

अटकेतील दोघा आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ( Police Custody ) सुनावली आहे.

हे ही वाचा - Beaten and robbed : एकांतात फिरायला गेलेल्या युगुलाला मारहाण करून लुटले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.