ETV Bharat / city

सोन्यात जीव रंगल्यामुळे 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याला २१ जूनपर्यंत कोठडी

author img

By

Published : Jun 19, 2019, 4:07 AM IST

'तुझ्यात जीव रंगला' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेते मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीला पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

मिलिंद दास्ताने

पुणे - औंध येथील 'पीएनजी ब्रदर्स' या ज्वेलर्समधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 'तुझ्यात जीव रंगला' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेते मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीला पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

चतुःशृंगी पोलीस ठाण्यात मागील आठवड्यात अभिनेता मिलिंद दास्ताने आणि त्याची पत्नी सायली मिलिंद दास्ताने उर्फ सायली बालाजी पिसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत त्यांना त्यांच्या घरातून अटक केली. याप्रकरणी 'पीएनजी ब्रदर्स'च्या अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ यांनी तक्रार दिली होती.

काय आहे प्रकरण -

दास्ताने दाम्पत्याने औंध येथील 'पीएनजी ब्रदर्स' या ज्वेलर्समधून कर्मचाऱ्यांशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली. त्यासाठी त्यांनी काही पैसे दिले होते. मात्र उर्वरीत रक्कम देण्यास ते टाळाटाळ करू लागले. अखेर अक्षय गाडगीळ यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Intro:'तुझ्यात जीव रंगला' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेते मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीला पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर मागील आठवड्यात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी औंध येथील पीएनजी ब्रदर्स या ज्वेलर्समधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत २५ लाख रुपयांची फसवणूक केली होती.Body:अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने आणि त्याची पत्नी सायली मिलिंद दास्ताने उर्फ सायली बालाजी पिसे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या पुण्यातील घरातून त्यांना अटक केली. याप्रकरणी पीएनजी ब्रदरचे अक्षय गाडगीळ यांनी तक्रार दिली आहे.
Conclusion:दास्ताने दाम्पत्याने औंध येथील पीएनजी ब्रदर या ज्वेलर्समधून कर्मचाऱ्यांशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसे दिले होते. मात्र उर्वरीत रक्कम देण्यास ते टाळाटाळ करू लागले. अखेर अक्षय गाडगीळ यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना आज अखेर अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.