ETV Bharat / city

'सरकारने पर्यटनाबाबत नवीन नियमावली तयार करायला हवी' - झेलम चौबळ

कोरोना या व्हायरसमुळे गेल्या दीड वर्षांपासून अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अनेकांसमोर उदरनिर्वाहाचे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इंडस्ट्रीपैकी एक म्हणजे पर्यटन. असे असताना आत्ता पर्यटन क्षेत्र जर सुरू करायचं असेल तर त्यात बदल करावेच लागणार आहेत. देशांतर्गत पर्यटनाला जास्त महत्त्व देण्याची गरज आहे आणि त्यासाठी सरकारने त्या त्या राज्यासाठी एक नियमावली तयार करायला हवी. तसेच राज्याची पर्यटनाबाबत स्पष्ट नियमावली असणे खूप गरजेचे आहे, असं मत झेलम चौबळ यांनी व्यक्त केलं.

tourism department affected by corona says zelam chaubal
पर्यटन
author img

By

Published : Jun 10, 2021, 10:12 AM IST

पुणे - कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत असताना त्याचे आर्थिक, सामाजिक, परिणाम ही समोर येत आहे. या व्हायरसमुळे गेल्या दीड वर्षांपासून अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अनेकांसमोर उदरनिर्वाहाचे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इंडस्ट्रीपैकी एक म्हणजे पर्यटन. गेल्या दीड वर्षात लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये काही व्यवसाय सुरू झाले आणि परत दुसऱ्या लाटेत बंद झाले. आत्ता निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू झाले. पण गेल्या दीड वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील पूर्णच व्यवसाय ठप्प असल्याने या व्यवसायासमोर अनेक अडचणी निर्माण झाले आहे.

दीड वर्षात 100 टूर्सचे देखील नियोजन नाही -

पर्यटन आणि पर्यटक हाच केंद्रबिंदू मानून जगपर्यटनाची दर्जेदार सेवा देणाऱ्या केसरी टूर्सला 35 वर्ष पूर्ण झाले आहे. या 35 वर्षात देशासह विदेशातही सेवा देणाऱ्या केसरी टूर्स गेल्या दीड वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे. भारतात गेल्या 6 ते 7 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ग्रोथ होत होती. तब्बल 20 टक्के एवढी वाढ यात झाली होती. पण लॉकडाऊन नंतर पर्यटन तर नाहीच पण इंटायर हॉस्पिलिटी पुर्णपणे बंदच आहे. मधल्या काळात सप्टेंबर ते डिसेंबर या काळात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर असं वाटलं होतं की हा क्षेत्र पुन्हा उभारी घेईल पण कोरोनाची दुसरी लाट आली आणि बंद असलेलं हे क्षेत्र पुन्हा बंद करावं लागलं. वर्षाला एक हजार टूर्सचे नियोजन करणारे आम्ही गेल्या दीड वर्षात 100 टूर्सच देखील नियोजन केलेलं नाही, अशी माहिती केसरी टूर्सच्या डायरेक्टर झेलम चौबळ यांनी दिली.

सरकारने पर्यटनाबाबत नवीन नियमावली तयार करायला हवी..

सर्वाधिक मोठा फटका पर्यटन क्षेत्राला -

भारतातील विविध राज्यासह विदेशातील सातही खंडामध्ये केसरी टूर्सतर्फे टूर्सचे आयोजन केले जाते. फेब्रुवारी मार्च महिन्यात सर्वच टूर्स कंपन्यांनी आपापल्या व्यवसायाची फ्युचरची पूर्ण तयारी केली होती. अनेक हॉटेल्समध्ये आगाऊ रक्कम देखील देण्यात आली होती. तसेच अनेक नॅशनल, इंटरनॅशनल फ्लाईट्स देखील बुकिंग करण्यात आल्या होत्या. मात्र, मार्च महिन्यात लॉकडाऊन लागलं आणि सगळ्या नियोजनावर पाणी फिरलं. दीड वर्ष झालं पण अजूनही आगाऊ दिलेली रक्कम आणि बुक केलेली फ्लाईट्स रद्द झाली नाहीये. लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसायिकांना फटका बसला पण ते आत्ता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र पर्यटन क्षेत्र लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून जे बंद आहे ते बंदच आहे. लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका या क्षेत्राला बसला असून त्याची भरपाई करणे खूप अवघड आहे, असे यावेळी चौबळ यांनी सांगितले.

पर्यटन क्षेत्रात बदल होणे गरजेचे -

कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असताना राज्य सरकारच्यावतीने निर्बंध कमी करण्यात आले आहे. पण तिसऱ्या लाटेचा धोका ही असल्याचे मत तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आले आहे. असे असताना आत्ता पर्यटन क्षेत्र जर सुरू करायचं असेल तर त्यात बदल करावेच लागणार आहेत. देशांतर्गत पर्यटनाला जास्त महत्त्व देण्याची गरज आहे आणि त्यासाठी सरकारने त्या त्या राज्यासाठी एक नियमावली तयार करायला हवी. तसेच राज्याची पर्यटनाबाबत स्पष्ट नियमावली असणे खूप गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे एअरलाईन्सनी देखील वेळीवेळी नियमात बदल न करता एकच नियमावली तयार करायला हवी, असेही यावेळी चौबळ यांनी सांगितलं.

यापुढे लसीकरणाला जास्त महत्त्व..

लॉकडाऊनमुळे सवयी आणि विचार दोन्ही बदललेली आहे. त्यामुळे नक्कीच या क्षेत्रात बदल होणार आहे. परदेशात जात असताना लसीकरणाला महत्त्व दिलं जाणार आहे. ज्याचे लसीकरण असेल अशाच लोकांना पर्यटनासाठी जाता येणार आहे. यापुढे प्रत्येक देशाच्या नियमावली नुसारच नियोजन करावं लागणार आहे. त्याच बरोबर ऑनलाईनला देखील महत्त्व येणार आहे असं ही यावेळी झेलम चौबळ म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.