पुणे - गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ( Torrential Rain ) सुरू आहे. आयएमडीच्या रिपोर्ट नुसार राज्यातील कोस्टर भागात ऑरेंज ते रेड अलर्ट ( Red alert ) ची सूचना देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या ( NDRF ) 17 टीम तयार करण्यात आल्या आहे. यातील 5 टीम मुंबईत,दोन दोन टीम कोल्हापूर,रत्नागिरी,ठाणे,तसेच रायगडला पाठविणार आहेत. तर एक-एक टीम पालघर, सिंधुदुर्ग, तसेच साताऱ्यात तैनात करण्यात आली आहे. अशी, माहिती 5 बटालियन एनडीआरएफ कमाडींग ऑफिसर एसएच अनुपम श्रीवास्तवा यांनी दिली आहे.
अरबी समुद्रातून सध्या महाराष्ट्राच्या दिशेने मोठय़ा प्रमाणावर बाष्प येत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीचा भाग, त्यालगत थेट पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मोठय़ा प्रमाणातवर ढग निर्माण होत आहे. राज्यातील काही भागांमध्ये दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस होणार आहे. तर, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ चे जवान देखील विविध जिल्ह्यात तैनात करण्यात आले असून कोणतीही आपत्ती घडल्यास त्या आपत्तीस नियंत्रण करण्यात हे जवान तत्पर असल्याचे यावेळी श्रीवास्तवा यांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा - Ship sank in Arabian Sea: पोरबंदरहून यूएईला जाणारे जहाज अरबी समुद्रात बुडाले, 22 जणांना वाचवले