पुणे- कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (शुक्रवारी) या रोगामुळे आणखी 10 जणांचा बळी गेला, तर 242 नवीन रुग्ण आढळले. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 303 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 6093 रुग्ण झाले आहेत. आज 185 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यातील 166 रुग्ण गंभीर असून यातील 45 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5 हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत चालली आहे. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.
आजपर्यंत पुण्यात कोरोनाची बाधा झालेले एकूण 6093 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 3450 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 2340 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 303 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.