ETV Bharat / city

पुण्याच्या चाकणमध्ये ऑक्सिजन अभावी ३ कोरोना रुग्णांचा गुदमरुन मृत्यू - chakan, pune

एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या या तीनही रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची कबुली स्वतः रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.

चाकणमध्ये ऑक्सिजनअभावी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 21, 2021, 6:42 AM IST

Updated : Apr 21, 2021, 12:21 PM IST

खेड(पुणे) : कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनअभावी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील चाकणमधून समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या या तीनही रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची कबुली स्वतः रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.

चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेश घाटकर यांनी याविषयी माहिती दिली

तीन रुग्णांचा मृत्यू

याविषयी सविस्तर वृत्त असे की, खेड तालुक्यातील चाकण येथील चाकण क्रिटिकेअर रुग्णालयातील तीन रुग्णांचा ऑक्सिजनअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे येथील 20 हून अधिक कोरोनाबधित रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले असून एक रुग्णाचा शिफ्टींगदरम्यान तर तर दोन रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याची माहिती चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटलचे डायरेक्ट डॉ. राजेश घाटकर यांनी दिली आहे.

लवकरच ऑक्सिजन पुरवठ्याचे प्रशासनाचे आश्वासन

हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा नसल्याने रुग्ण ऍडमिट करून घेतले जात नाहीत. या परिस्थितीत ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदार, तसेच जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असून हॉस्पिटलला लवकरात लवकर ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ऑक्सिजनसाठी धावपळ
चाकण परिसरातील अनेक हॉस्पिटलमधून रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनची व्यवस्था करा अशी रुग्णालयांकडून मागणी होत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खेड तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा जर असाच राहिला तर आणखी कोरोनाची आणखी बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खेड तालुक्यात एकूण चार ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्या असूनही तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. ऑक्सिजनसाठी खेड तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचीही मोठी धावपळ होत आहे.

Last Updated : Apr 21, 2021, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.