पुणे - आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३५ लाखाचे परकिय चलन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी दोघाना ताब्यात घेण्यात आले आहे. मयूर पाटील आणि बालाजी मुस्तपुरे, अशी अरोपींची नावे आहेत.
स्पाईस जेट कंपनीच्या विमानाने आरोपी दुबईला जाणार होते. त्यापूर्वीच दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना हे परकिय चलन एक व्यक्तीने दिले होते. हे चलन दुबईमधील दुसऱ्या व्यक्तीला दिले जाणार होते.