ETV Bharat / city

Slab Collapsed in Pune : बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला; पाच जण जखमी - wanwadi pune

पुण्यातील वानवडी परिसरात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब ( Slab Collapsed in Pune ) कोसळला आहे. स्लॅब कोसळल्याने पाच जण जखमी झाले आहेत. वानवडी येथील अलंकार हॉलसमोर ही दुर्घटना झाली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्याला सुरुवात झाली आहे. स्लॅबखाली ( Slab Collapsed In Wanwadi Pune ) कोणी अडकले आहे का, याचा शोध सुरु आहे.

Slab Collapsed in Pune
पुण्यातील वानवडी परिसरात स्लॅब कोसळला
author img

By

Published : May 2, 2022, 6:03 PM IST

Updated : May 2, 2022, 8:08 PM IST

पुणे - पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीचं ( Slab Collapsed in Pune ) काम सुरू असताना धक्कादायक घटना घडली आहे. वानवडीमधील विकासनगर येथील बांधकाम चालू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला असून सर्व जखमींना जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून घटनास्थळी अग्निशमन अधिकारी आणि पोलीस दाखल झाले आहेत. वानवडी येथील ( Slab Collapsed In Wanwadi Pune ) अलंकार हॉलसमोर ही दुर्घटना झाली आहे.

एका कामगाराचा मृत्यू - या घटनेत पाच जणांना गंभीर जखम झाली असून यात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे सगळे मजूर परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आज दुपारी ४.१५ वाजता ही घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. राम नरेश पाल (४५) असे मृत्यू झालेल्या कामगारचे आहे. या इमारतीचं मागच्या ६ महिन्यांपासून बांधकाम सुरू होते. या ठिकाणी भौरी समाजाच्या मशिदीच आणि कम्युनिटी हॉलचं बांधकाम सुरु होत. एकूण ३ मजली इमारतीत बांधकाम होत. त्यातील दुसऱ्या मजल्याच्या स्लॅब कोसळला आहे.

जागेचा वाद असतानाही बांधकाम सुरू - इथल्या स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या इमारतीच्या बांधकामाच्या जागेवर सुरू आहे. त्या जागेचा वाद हा रस्त्यामुळे कोर्टात गेला होता आणि तरी इथं हे बांधकाम सुरू होतं. मात्र, कोर्टाने स्टे उठवला होता.

हेही वाचा - Raj Thackeray Speech Controversy: मनसेकडून महाआरती रद्द, तर राज ठाकरेंवर कारवाईची अनेकांची मागणी; वाचा दिवसभरात काय घडलं?

Last Updated : May 2, 2022, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.