ETV Bharat / city

Republic Day Special : पुण्यातील शेख कुटुंबीय तीन पिढ्यांपासून बनवत आहे भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा - प्रजासत्ताक दिन विशेष

प्रजासत्ताक दिनाच्या ( Republic Day 2022 ) पार्श्वभूमीवर पुण्यात ठिकठिकाणी भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा झेंडा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. पुण्यात वास्तव्यास असलेले शेख कुटुंबीय हे गेल्या तीन पिढ्यांपासून तिरंगा बनविण्याचे काम ( Flag Making By Shaikh Family In Pune ) करते. या कामाचा त्यांना अभिमानही आहे.

पुण्यातील शेख कुटुंबीय तीन पिढ्यांपासून बनवत आहे भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा

author img

By

Published : Jan 25, 2022, 4:53 PM IST

पुणे : 15 ऑगस्ट 26 जानेवारी ( Republic Day 2022 ) हे दिवस जवळ आले की, आपल्याला रस्त्यारस्त्यांवर काड्या तावलेले छोटे राष्ट्रध्वज दिसू लागतात. हे झेंडे येतात कुठून, ते तयार कुठे होतात, असा प्रश्न पडलाय कधी तुम्हाला? हे झेंडे पुण्यातील राजेंद्र नगरमधील शेख कुटुंबाकडून शहरभर पुरवले जातात. त्यांच्या तीन पिढ्या अभिमानाने हे काम करत ( Flag Making By Shaikh Family In Pune ) आहेत.

पुण्यातील शेख कुटुंबीय तीन पिढ्यांपासून बनवत आहे भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा

यंदा 20 हजारहुन अधिक झेंडे बनविले

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या आधी 4 महिन्यांपूर्वी आम्ही झेंडे करण्याचं काम सुरू करतो. दिवसाला पाच हजार झेंडे सहज बनवतो. 'सारे पुना शहरमे जिधर देखो हमारे यहाँसे ही झंडा जाते है', असं सांगत यंदा 20 हजारहुन अधिक झेंडे केल्याचं शेख कुटुंबीय अभिमानाने सांगत आहे. दरवर्षी 50 हजारहुन अधिक झेंडे बनवतात. पण मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पश्वभूमीवर शाळा- महाविद्यालय बंद असल्याने 2 वर्ष थोड्याश्या प्रमाणात झेंडे बनवले. पण यंदा शाळा जरी बंद असल्या तरी 20 हजारहून अधिक झेंडे बनविले असून, यंदा चांगला व्यवसाय झाल्याचं शेख कुटुंबीय अभिमानाने सांगत आहे. कुटुंबातल्या महिलांच्या हातांचा स्पर्श झाला नाही, असा छोटा झेंडा पुण्यात कदाचित सापडणार नाही असं देखील यावेळी शेख म्हणाल्या.

व्यवसाय म्हणून नव्हे तर देशसेवा म्हणून

शेख कुटुंबाचा हा पारंपरिक व्यवसाय. राजेंद्र नगरमधील दत्त मंदिराजवळ शेख कुटुंब राहतं. या कुटुंबातील पुरुष लग्न किंवा पार्ट्यांमध्ये डेकोरेशनचं काम करतात. पण ऑगस्ट व जानेवारीत मात्र ही मंडळी झेंडे तयार करण्याच्या कामात गढून जातात. शहरातील सर्व किरकोळ विक्रेते यांच्याकडूनच झेंडे नेतात. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनी शहरभर चक्क लाखभर झेंडे शेख कुटुंबियांकडून पुरवले जातात. "हमारे ससूरजी से इस काम का सिलसिला शुरू हुआ, उसके बाद हमारे घर में अबतक ये काम चालू हैं. सब औरते और बच्चे मिलके झंडे बनाते है," असं शेख सांगतात. हे काम करायला आम्हाला अभिमान वाटतो. हे काम आम्ही व्यवसाय म्हणून नव्हे तर देशसेवा म्हणून करत असतो, असं देखील यावेळी शेख म्हणाल्या.

असे बनवितात झेंडे

या सणांच्या महिनाभर आधी शेख कुटुंबात तयारी सुरू होते. मंडईतून बांबूच्या काड्या, तिरंगी ताग, जिलेटीन पेपर, भिरभिन्यासाठी तारा अशा वस्तू येतात. "बांबूच्या काड्यांना डिंक लावणे, तिरंगा पेपर चिकटवणे, मग तारांच्या तुकड्यांनी जिलेटीन कागदाचं चक्र लावणे असं हे काम सलग सुरू असतं. मिरभिन्यांचे झेंडे कुणालाही परवडतील अशा दरात बाजारात येतात. त्यामुळे या झेंड्यांच्या उत्पादन खर्चाची काळजी घेणं गरजेचं असतं. कच्च्या मालाची नासधूस होऊन चालत नाही. विशेषत: डिंक, कागदाचे ताग, जिलेटीन पेपर्स जपावे लागतात. 'हे काम किचकट असलं तरी आता आम्हाला सवय झाली असून, आम्ही पटापट झेंडे बनवतो', असं देखील यावेळी शेख म्हणाल्या.

घरातील सर्वच व्यक्ती बनवितात झेंडे

शेख कुटुंब मोठं आहे. घरातले दहा लोक या कामात गुंतलेले असतात. एक व्यक्ती दिवसाला अंदाजे पाचशे ध्वज बनवते. दर दिवशी किमान पाच हजार झेंडे तयार होतात. कामाचा व्याप केवढा आहे हे त्यातून कळावं. अर्थात, हे कुटुंब लाखभर झेंड्यांचे उत्पादन करत असलं, तरी त्यातून फार नफा मिळत नाही, असं त्यांचं म्हणणं.

लॉकडाऊनचा बसला फटका

लॉकडाऊनचा फटका इतर सर्वांप्रमाणेच या धंद्यालाही बसला आहे. कोरोना काळातील १५ ऑगस्टवर लॉकडाउनचं सावट होतं. शाळा बंद होत्या. लोक घराबाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे झेंड्यांची मागणीही घटली. पण यंदा मात्र 20 हजार झेंडे बनविल्याने चांगला फायदा झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.