ETV Bharat / city

पडद्यामागील कलावंतांना मदत करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक -अजित पवार

कोरोनाच्या काळात नाटक, चित्रपटांचे प्रदर्शन बंद असल्याने, या वर्गाला अडचणींचा सामना करावा लागतो. कलाक्षेत्राला मदत करण्याची राज्य सरकारची भूमिका राहिली आहे. यापुढेही ती कायम राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. ते पुणे येथे आजोजित कार्यक्रमात बोलत होते.

author img

By

Published : Jul 2, 2021, 4:09 PM IST

पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञ यांना अपघाती विमा प्रमाणपत्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले

पुणे - चित्रपट व नाटकाच्या क्षेत्रात पडद्यामागे राहून काम करणाऱ्या प्रत्येक रंगकर्मीचे काम अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनाच्या काळात नाटक, चित्रपटांचे प्रदर्शन बंद असल्याने, या वर्गाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य शासनाने सर्वच गरीब, गरजू घटकांना मोफत अन्नधान्य, मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध केले आहेत. तसेच, सामाजिक संस्थांकडूनही अशा गरजूंसाठी मदतीचा हात पुढे येणे आवश्यक आहे. अशाच विचारातून पुणे येथील 'आनंदी वास्तू’ व ‘संवाद-पुणे' या संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. या संस्थेचे हे काम अत्यंत महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

पुणे येथील पत्रकार भवन येथे रंगमंचावरील पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञ यांना अपघाती विमा प्रमाणपत्राचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

'राज्य करकार मदत करण्यासाठी सकारात्मक'

पुणे येथील पत्रकार भवन येथे रंगमंचावरील पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञ यांना अपघाती विमा प्रमाणपत्राचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य सरकार कलावंताना मदत करण्यासाठी कायम सकारात्मक आहे. तसेच, लवकरच त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घतला जाईल, असेही पवार म्हणाले. यावेळी आनंदी वास्तू संस्थेचे अध्यक्ष आनंद पिंपळकर, संवादचे सुनील महाजन, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालिका निमिता मोघे, डॉ. अश्विनी शेंडे उपस्थित होते.

'संवाद-पुणे' संस्थेचे कार्य कौतुकास्पद'

नाटक-चित्रपटांच्या झगमगाटी दुनियेत, पडद्यामागे राहून, कलाक्षेत्राची सेवा करणाऱ्या रंगकर्मींना, कोरोना संकटकाळात, विमा संरक्षणाचा आधार दिल्याबद्दल ‘आनंदी वास्तू’ व ‘संवाद-पुणे' संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे असे पवार म्हणाले. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याकडे बघितले जाते. साहित्य, नाटक, चित्रपट, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात पुण्याने नेहमीच आदर्श निर्माण केला आहे. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात काम करत असताना ‘आनंदी वास्तू’ व ‘संवाद-पुणे' संस्थेनं, गरजू रंगकर्मींसाठी मदतीचा हात पुढे करुन, एका आगळ्यावेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडवले आहे.

'कोरोनाचा धोका कमी होईल, तसे निर्बंध हळू हळू कमी केले जातील'

मराठी माणूस नाटकवेडा आहे. नाट्यकलेला पहिल्यापासून राजाश्रय आणि लोकाश्रय मिळत आला आहे. नाटक व चित्रपटांनाही शासनाची कायम मदतीचीच भूमिका राहीली आहे. चित्रपट व नाटकाच्या क्षेत्रात पडद्यामागे राहून काम करणारा, सामान्य रंगकर्मी यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या काळात नाटक, चित्रपटांचे प्रदर्शन बंद असल्याने, या वर्गाला अडचणींचा सामना करावा लागतो. कलाक्षेत्राला मदत करण्याचीच राज्य शासनाची भूमिका राहिली आहे. यापुढेही ती कायम राहील, असा विश्वासही पवार यांनी दिला. कोरोनामुळे चित्रपटांच्या, नाटकांच्या प्रदर्शनांवर काही निर्बंध आहेत. मध्यंतरी आपण निर्बंध कमी केले. त्यानंतर अचानक रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे ते कमी करावे लागले. हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजनची कमी जाणवायला लागली. या परिस्थितीत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाईलाजाने काही निर्बंध लावले आहेत.

'लोकांचा जीव वाचला पाहिजे'

लोकांचा जीव वाचवण्याला आपले पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे जसा धोका कमी होईल, तसे निर्बंध हळू हळू कमी केले जातील असे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. यावेळी पवार यांच्या हस्ते पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञ यांना अपघाती विमा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच, निवडक कलावंताचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, पडदयामागील कलावंत-तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.