ETV Bharat / city

प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईचा खून करणारा मुलगा प्रेयसीसह गजाआड - आईचा खुन करणाऱ्या मुलाला पोलिसांनी केली अटक

प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईचा खून करणारा मुलला प्रेयसीसह पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा आधीक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

son who murdered his mother, who was an obstacle in a love affair, went missing with his girlfriend
प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईचा खून करणारा मुलगा प्रेयसीसह गजाआड
author img

By

Published : Mar 9, 2021, 10:32 PM IST

पुणे - प्रेमसंबंधात अडसर ठरणार्‍या आईचा प्रेयसीच्या मदतीने खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला आणि त्याच्या प्रेयसीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. विशाल राम वंजारी (वय 19, रा.माने वस्ती, वढू खुर्द, हवेली), नॅन्सी गॅब्रिअल डोंगरे (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी सुशीला राम वंजारी (वय 38) या महिलेचा खून केला होता.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुशीला वंजारी ही महीला मृत अवस्थेत घरासमोर पडली असल्याची माहिती लोणीकाळभोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत महिलेचा मुलगा विशाल वंजारी याने शिवा देशमुख (जालना) याने पैशाच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार करून खून केल्या संबंधी फिर्याद दिली होती.

लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली असता फिर्यादी विशाल वंजारी याच्या जबाबात तफावत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली असता मृत महिलेचा मुलगा विशाल वंजारी यानेच आपल्या प्रेयसी सह हा खून केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी विशाल वंजारी आणि नॅन्सी डोंगरे यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला सुशीला वंजारी यांचा विरोध होता. याशिवाय आरोपी विशाल वंजारी हा नेहमी घरातील पैसे चोरायचा. आठ मार्चला ही त्याने घरातील पंधरा हजार रुपये चोरले या संशयावरून मायलेकामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी आरोपी विशाल वंजारे याने प्रेयसीच्या मदतीने रागाच्या भरात आईवर चाकूचे अनेक वार करून खून केला. त्यानंतर ती मृत्युमुखी पडल्याचे लक्षात आल्यानंतर घराबाहेरील ओट्याजवळ मृतदेह आणून टाकला. त्यानंतर हा खून दुसऱ्याने केला असल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, लोणी काळभोर पोलिसांनी चाणाक्षपणे तपास करत हा बनाव उघडकीस आणला आणि दोघांनाही अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.