पुणे : पीएफआयच्या कार्यकर्त्याने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा (sloganeering of Pakistan Zindabad) दिल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्यावर अतिशय शुल्लक गुन्हे दाखल करून त्यांना सोडून देण्यात आले. अशी माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्याने आता त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिसांमध्ये तक्रार दिली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल (case against sloganeering of Pakistan Zindabad) करा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, पुणे पोलिसांनी दिरंगाई टाळावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलेली (social workers complaint against sloganeering) आहे.
प्रश्न देशाच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेचा - राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा गुन्हे दाखल करा, असे निर्देश दिले असताना सुद्धा पुणे पोलीस मात्र या गोष्टी अजूनही गंभीरपणे घेत नाहीत. आम्ही अजून सुद्धा त्याची चौकशी करत आहोत. व्हिडिओ तपासून पाहत आहोत, तपास चालू आहे अशी पुणे पोलिसांची भूमिका आहे. त्या विरोधात आता आडवोकेट प्रदीप गावडे यांच्यामार्फत ही तक्रार बंद गार्डन पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावा, हा प्रश्न देशाचा आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेचा आहे. त्यामुळे यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी, या सर्व कार्यकर्त्यांनी आता पुणे पोलिसांकडे केलेली (social workers complaint to police) आहे.