पुणे - पुण्यातील जुन्या पुरातन वास्तूंमध्ये सिमला ऑफिसची ( Simla Office Pune ) गणना होते. सिमला ऑफिस म्हणजे 'पुणे वेधशाळा' होय. शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या या पुणे वेधशाळेचा इतिहास ( India Meteorological Department History Pune ) फार रंजक आहे. 'पुणे वेधशाळा' ही भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) हवामान संशोधन व सेवेचे (क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेस- सीआरएस) राष्ट्रीय केंद्र आहे. सिमल्यावरुन हे मुख्यालय पुण्यात आल्याने या वेधशाळचे नामकरण सिमला ऑफिस झाले.
दहा एकरांच्या आवारात आयएमडीची वेधशाळा आणि कार्यालयाची इमारत आहे. तसेच, अधिकाऱ्यांचे निवासी संकुल देखील येथे आहे. पुणे वेधशाळेची ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून देखील गणली जाते. ब्रिटिश काळात भारतीय हवामानशास्त्र विभाग हा शिमला आणि कोलकाता येथे होता. मात्र, देशभर दळणवळणच्या दृष्टीने आणि हवामानाच्या अनुकूलतेमुळे या विभागाचे पुण्यात स्थलांतर करण्यात आले.
२० जुलै १९२८ रोजी पुण्यातील पूर्वीचे भांबुर्डा आणि सध्याचे शिवाजीनगर येथील सदर इमारतीचे कामकाज सुरु झाले. या इमारतीला 90 हून अधिक वर्ष पूर्ण झाली आहे. अजूनही मुख्य ब्रिटिशकालीन इमारत दिमाखात सुस्थितीत आहे. पुणे वेधशाळेतर्फे मान्सूनचे दीर्घकालीन अंदाज तयार करणे. देशभरातील वेधशाळांसाठी उपकरणे तयार करणे. हवामानानुसार शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन देशभरातील हवामानाच्या नोंदीचे संकलन आणि देश-विदेशातील हवामान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम होते.
हेही वाचा - Fadnavis On CM : मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार नाही - देवेंद्र फडणवीस