ETV Bharat / city

Sidhu Musewala Murder Pune Connection : शार्प शूटर संतोष जाधव हा गवळी गँगचा प्यादा! - कोण आहे संतोष जाधव

सिद्धू मुसेवाला ( Sidhu Musewala murder case ) यांची हत्या झाल्यानंतर याबाबतचे अनेक खुलासे समोर येत आहेत. हत्या करण्यासाठी पुण्यातील दोन शार्प शुटरला ( Two sharp shooters from Pune ) पंजाबमध्ये बोलावण्यात आले होते. या एक आरोपी संतोष जाधव हा गवळी गँगचा हस्तक ( Santosh Jadhav member of Gawli Gang ) असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकरणात आठ लोकांची संशयित म्हणून छायाचित्रे समोर आली आहेत.

Sidhu Musewala Murder Pune Connection
शार्प शूटर संतोष जाधव हा गवळी गँगचा प्यादा
author img

By

Published : Jun 7, 2022, 5:32 PM IST

Updated : Jun 7, 2022, 6:30 PM IST

पुणे - पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील गवळी ( Santosh Jadhav member of Gawli Gang ) टोळीशी जोडले जात असून 8 शार्प शूटर्सपैकी पुण्यातील संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असल्याची माहिती समोर येत आहे. संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी येथील रहिवासी असून त्याचा या हत्याकांडात समावेश असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी संतोष आणि सौरभ विरोधात लुक आउट नोटीस जारी केली आहे. सिद्धू मुसेवाला ( Sidhu Musewala murder case ) यांची हत्या झाल्यानंतर याबाबतचे अनेक खुलासे समोर येत आहेत. हत्या करण्यासाठी पुण्यातील दोन शार्प ( Two sharp shooters from Pune ) शुटरला पंजाबमध्ये बोलावण्यात आले होते. या प्रकरणात आठ लोकांची संशयित म्हणून छायाचित्रे समोर आली आहेत.

कोण आहे संतोष जाधव? : संतोष जाधव हा मूळचा आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पोखरी गावचा आहे. मात्र त्याचे वास्तव्य मंचर मध्ये होते. आई वडील बहीण असे चौघे जण मंचरमध्ये राहत होते. मंचर पोलीस स्टेशन हद्दीत राण्या उर्फ ओमकार बाणखीले यांचा 1 ऑगस्ट 2021 रोजी खून करण्यात आला होता. या खुनात सहभागी असल्याचा गुन्हा त्यावर दाखल आहे. तसेच मंचर पोलीस ठाण्यात एक खंडणीचा, चोरीचा गुन्हा देखील दाखल आहे. राण्या बाणखीले खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला असून तो तेव्हापासून फरार आहे. या प्रकरणात त्याला तडीपार करण्यात आले होते. तेव्हापासुन तो राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागात वास्तव्यास होता. येथे त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आगळ्या वेगळ्या पेहरावाचे आकर्षण : पुण्याच्या ग्रामीण भागात तरुणांवर लॉरेनस् बिस्नोई गँगचा प्रभाव असल्याचे समोर येत आहे. आज कालचे तरुण या गँगच्या मोहोरक्याप्रमाणे आपला पर्सनॅलिटी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कपाळावर लाल कुंकू, दाढी साधारण वाढलेली, अंगावर काळे कपडे, गळ्यात काळी शाल, रुद्राक्षाची माळ, बंदुकी बरोबरचे फोटो असा पेहराव साधारण या गॅंगचा असतो. संतोष जाधव सुध्दा त्या गॅंगशी निगडीत आहे. पण आत्ता तो गवळी टोळीचा हस्तक असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा - Sidhu Musewala Murder Case : संतोष जाधवची आई म्हणते,'...तर मी मुलाला पाठिशी घालणार नाही'

Last Updated : Jun 7, 2022, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.