ETV Bharat / city

Shivswarajya Din : 'भारताचा पहिला स्वातंत्र दिन म्हणजे ६ जून १६७४'; उदय सामंत यांच्या उपस्थितीत उभारली ५१ फुटी स्वराज्यगुढी - Shivswarajya Din on BJP

सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समतेने भरली. रयतेचे पालनपोषण करणारे सार्वभौम छत्रपती झाले. त्यामुळे आजही शिवरायांचे स्वराज्य हे भारतीयांच्या मनावर राज्य करते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून पुढील वर्षापासुन शिवस्वराज्य दिन हा राज्यातील एक गडकिल्ल्यावर साजरा ( Shivswarajya Din celebration ) केला जाणार असल्याची माहिती यावेळी सामंत यांनी यावेळी दिली.

Shivswarajya Din
उदय सामंत
author img

By

Published : Jun 6, 2022, 5:42 PM IST

पुणे - शतकोनशतके पारतंत्र्यात घालवल्या नंतर खऱ्या अर्थाने भारताचा पहिला स्वातंत्र दिन म्हणजे ६ जून १६७४ शिवराज्याभिषेक दिन ( Shivrajyabhishek Day ). या दिवशी शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत घेतला. सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समतेने भरली. रयतेचे पालनपोषण करणारे सार्वभौम छत्रपती झाले. त्यामुळे आजही शिवरायांचे स्वराज्य हे भारतीयांच्या मनावर राज्य करते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून पुढील वर्षापासुन शिवस्वराज्य दिन ( Shivswarajya Din celebration ) हा राज्यातील एक गडकिल्ल्यावर साजरा केला जाणार असल्याची माहिती यावेळी सामंत यांनी यावेळी दिली.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया

उभारली 51 फुटी स्वराज्यगुढी - जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गगनभेदी जयघोषात… रणशिंगाच्या ललकारीत… ढोलताशाच्या गजरात… मर्दानी खेळाच्या चित्तथरारात… एसएसमीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल स्मारक परिसर दणाणून गेला. निमीत्त होते शिवजयंती महोत्सव समिती आयोजित शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे. सोहळ्याचे हे सलग १० वे वर्षे होते. यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड आणि सर्व स्वराज्यघराणी, स्वराज्यबांधव उपस्थित होते. यावेळी उदय सामंत व उपस्थित माताभगिनी यांच्या हस्ते भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे विधीवत पुजन करुन ५१ फुट स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा - शिवराज्याभिषेक दिन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्यामुळेच ६ जून शिवस्वराज्य दिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ साला पासून शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत. पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारली जाते. त्याच बरोबरीने यावर्षी ५१ गडांवर तसेच पुण्यातील १०१ गणेशोत्सव मंडळानी देखील स्वराज्यगुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा केला.अस यावेळी आयोजक अमित गायकवाड यांनी सांगितले.

राज्यसभेत आमचे 4 उमेदवार निवडूण येतील - राज्यसभेची निवडणूक होणार असून त्यासाठी राज्यातील राजकारण हे चांगलंच तापलं आहे. प्रत्येक पक्ष हा तयारीला लागला असून भाजपकडून आमदारांची कार्यशाळा घेण्यात येत आहे. यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की राज्यसभेचे शिवसेनेचे दोन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस चा एक आणि काँग्रेस चा एक उमेदवार हे चारही उमेदवार हे आपल्याला मतमोजणी नंतर निवडून आलेले दिसतील. कोणीही कितीही प्रॅक्टिस केली तरी मतदान करताना काही लोक चुकणार आहे याची मला खात्री आहे. असे मत यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

मी आज तुमच्या समोर - महविकास आघाडी सरकारकडून आमदारांना नजकैदेत ठेवले जात असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. यावर सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, मी मंत्री असण्याच्या अगोदर एक आमदार आहे आणि आज तुमच्या समोर आहे, असे देखील यावेळी सामंत म्हणाले.

विद्यार्थी हे काही व्होट बँकची ॲसेट नाही - भारतीय जनता पक्षाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या बाबतीत आंदोलन करण्यात येत आहे. यावर मंत्री उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजप कधीही यात नव्हते. ज्या वेळेस परीक्षा रद्द केल्या होत्या, त्यावेळेस परीक्षा रद्द करू नका म्हणून ते रस्त्यावर उतरले, आता ऑफलाईन घेत आहोत तर ते म्हणत आहे की एमसीक्यू घ्या म्हणत आहेत. भाजप हा राजकीय पक्ष आहे. कुठतरी ते व्होट बँकसाठी हे करत आहे. पण मला त्यांना हे सांगायचे आहे की, विद्यार्थी हे काही व्होट बँकची ॲसेट नाहीये. विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरू नये, कुलगुरू यांच्या संमतीनेच आम्ही ऑफलाईनचा निर्णय घेतला आहे. असे यावेळी सामंत म्हणाले.

हेही वाचा - Shivsena Teaser : सत्ता असो वा नसो, आमचं हिंदुत्व तकलादू नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.