पुणे - राज्य सरकारच्या बहुचर्चित शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. शहरातील एका शिवभोजन केंद्रावर तुफान गर्दी उसळल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात शिवभोजनाचे वाटप सुरू आहे.
शिवभोजन थाळीला याप्रकारे पोलीस बंदोबस्त द्यावा लागल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. शहरातील मार्केटयार्ड येथील उपहारगृहात शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरू करण्यात आलायं.
पहिल्या दिवसापासूनच या केंद्रावर गर्दी उसळली आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी उपहारगृह चालकाने केली. त्यानुसार आता दररोज याठिकाणी पोलीस बंदोबस्तात या थाळीचे वाटप केले जात आहे.