पुणे : आज रोज सकाळी उठल्यावर विरोधकांना देखील सावरकरच लागतात. 'आज झालेल्या कार्यक्रमातील मुलं बघा आणि दिल्लीतील एक मुलगा बघा.. ( राहुल गांधी यांचा नाव न घेता ) मुला मुलांमध्ये पण किती फरक असतो'. 'एवढ्या इयत्ता दोन- तीन मध्ये असलेल्या मुलांना एवढे कळते; तो एवढा मोठा घोडा झाला त्याला कळत नाही', अशी टीका अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, पन्नाशी आली तरी गोळवळकर हे नाव देखील म्हणता येत नाही.
‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी' चे (डीईएस) 'मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय' तर्फे 'मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर' (Vinayak Damodar Savarkar) नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते शरद पोंक्षे, दिग्दर्शक आणि अभिनेता योगेश सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यात जे मुख्यमंत्री झाले आहेत, ते माझे मित्र आहे. शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झाले की, मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि या कार्यक्रमाची सिडी त्यांना देणार आहे. या कार्यक्रमाचे राज्यभर प्रयोग झाले पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपण सर्व सावरकर प्रेमी आहोत. राज्यात अश्या शाळा आहेत, जिथे सावरकर यांचे फोटो देखील नाही. तिथे सावरकर यांचा धडा देखील शिकवला जात नाही, भलतचं शिकवले जाते. अश्या शाळांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'मृत्युंजय सावरकर' हा कार्यक्रम करू आणि त्यासाठी मी प्रयत्न करेल असे देखील यावेळी पोंक्षे यांनी सांगितले.
हेही वाचा : Neeraj Chopra success celebration: नीरज चोप्राच्या घरी आनंद साजरा; गाण्यांच्या तालावर महिलांचा ठेका