ETV Bharat / city

Sharad Pawar on Gandhi Neharu Thoughts : महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरु यांचा विचार आम्ही कधीही सोडला नाही - शरद पवार - Sharad Pawar guidance

ज्येष्ठ खासदार श्रीनिवास पाटील ( MP Shrinivas Patil 82th Years old ) आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे ( Editor Madhukar Bhave ) यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण करून 82 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे आज बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या ( Sharad Pawar felicitated Ex governor Shrinivas Patil ) हस्ते हा सन्मान करण्यात आला.

शरद पवार
शरद पवार
author img

By

Published : Mar 5, 2022, 10:37 PM IST

Updated : Mar 5, 2022, 10:57 PM IST

पुणे - महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांचा विचार आम्ही कधीही सोडला नाही. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे हे राजकारणात गेले तरी आपण एकाच ठिकाणी आहोत. कारण, आपण विचार कधी सोडला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

पुण्यात आज कृतज्ञता सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ( Ex home minister Sushilkumar Shinde ) म्हणाले की शरद पवार यांच्या सांगण्यावरून नोकरी सोडून मी राजकारणात ( Sharad Pawar guidance ) प्रवेश केला. पण मी कायम त्यांच्यासोबत राहू शकलो नाही. याची मनात खंत आहे. त्यांच्याही मनात खंत असेल. त्यावर शरद पवारांनी महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांचे विचार कधीही सोडले नसल्याचे सांगितले.

मैत्रीवर अढळ निष्ठा ठेवल्याने गाठली उंची

खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांचे 82 व्या वर्षात वर्धापन

ज्येष्ठ खासदार श्रीनिवास पाटील ( MP Shrinivas Patil 82th Years old ) आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे ( Editor Madhukar Bhave ) यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण करून 82 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे आज बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या ( Sharad Pawar felicitated Ex governor Shrinivas Patil ) हस्ते हा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा सत्कार

हेही वाचा-इंग्रजी पेपर मधील चुकीच्या ‘त्या’ प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार

मधुकर भावेंची आचार्य अत्रेंवर नितांत श्रद्धा
शरद पवार म्हणाले, एस.पी. कॉलेजमध्ये एका कथ्थक नृत्यांगनेकडून 'हे नृत्य करायलाही अक्कल लागते', अशा जिव्हारी लागणाऱ्या वाक्याची खूणगाठ बांधून थेट रोहिणी भाटे यांच्या नृत्य शाळेत कथ्थकचे धडे गिरवणारा माझा मित्र श्रीनिवास आहे. तर थेट सिक्कीमच्या राज्यपाल पदापर्यंत मजल मारलेला माझा मित्र श्रीनिवास याच्या माझ्यावर असलेल्या प्रेमात मला यत्किंचीतही फरक आढळून येत नाही. मधुकर भावेंनीदेखील आचार्य अत्रेंवर नितांत श्रद्धा ठेवून पत्रकारिता क्षेत्रात एक शिखर गाठले. आज सत्कार करण्यात आलेल्या या दोन्ही सत्कारार्थींनी त्यांच्या श्रद्धा स्थानावर आणि मैत्रीवर जी अढळ निष्ठा दाखवली, त्यामुळे ते या उंचीपर्यंत येऊ शकले. अशा विविध प्रसंगामधून ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांच्या व्यक्तीमत्वांचे अंतरंग उलगडले.

पत्रकार मधुकर भावेंचा सत्कार
पत्रकार मधुकर भावेंचा सत्कार

हेही वाचाTarpaulin Stuck to Overhead Wire : ओव्हर हेड वायरला अडकली ताडपत्री; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

एसपी कॉलेजमध्ये चकरा व्हायच्या, कारण...
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, माझे आणि श्रीनिवास पाटील यांचे महाविद्यालयीन शिक्षण वेगवेगळ्या महाविद्यालयात झाले. श्रीनिवास पाटील हे एस.पी. कॉलेजला तर मी बीएमसीसी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. आमचे महाविद्यालय हे वाणिज्य शाखेचे असल्याने तिथे शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या तुलनेने कमी होती. त्यामुळे आमच्या वरचेवर एसपी कॉलेजमध्ये चकरा व्हायच्या. आम्ही ग्रामीण भागातून आलेलो असल्याने बीएमसीसीपेक्षा एसपी कॉलेजमध्ये अधिक मोकळेपणाने वावरत असू. येथून जी आमची दोस्ती जमली ती आजवर कायम आहे.

हेही वाचा-Researcher Opinion On OBC Reservation : ओबीसींच्या आरक्षणासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर कायदा करा - अभ्यासकांचे मत

कृतज्ञ आणि विचारांशी बांधिलकी ठेवली - शरद पवार

राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सुरूवातीच्या काळात सभांची भित्तीपत्रके चिकटवण्याचे काम आम्ही दोघांनी सोबत केले आहे. श्रीनिवास पाटील त्या भित्तीपत्रकांना खळ लावून द्यायचे. मी सायकलवर उभे राहून ते भिंतीवर लावायचो, असा आमचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. मधुकर भावे हे प्र.के. अत्रेंच्या 'मराठा'मध्ये नोकरी करीत होते. रोखठोक आणि सडेतोड लिहिण्याचा गुण त्यांनी अत्रेंकडूनच घेतला. आमचीदेखील राजकीय भूमिका कुठे चुकत असेल, तर त्याबाबतही लिहितांना त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. आम्ही गरिबीतून आणि हालअपेष्टातून पुढे आलो. पण आम्हाला हात दिलेल्यांशी कृतज्ञ आणि विचारांशी बांधिलकी ठेवली, त्यामुळे प्रगती करीत राहिलो.

गृहमंत्री असताना सुशिलकुमार शिंदे हे वकील म्हणून यायचे-

गृहमंत्री असताना तडीपारच्या केस तेव्हा वकिली करणारे सुशीलकुमार शिंदे घेऊन यायचे. तेव्हा आरोपींना समजावून तडीपारीच्या शिक्षेतून जाऊ द्यायचो. तेव्हा सुशीलकुमार शिंदे हे बाजू मांडत असतील तर तडीपार होणे टळते, अशा माहिती पसरली होती, अशी आठवणही शरद पवार यांनी सांगितली.

त्यांच्यासोबत कायम राहू शकलो नसल्याची खंत - सुशीलकुमार शिंदे
यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र घडविताना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची शिकवण शरद पवारांनी दिली. श्रीनिवास पाटील एसपी. कॉलेजमध्ये आणि पवार बीएसीसी मध्ये शिकत असताना मी आयएलएस विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. शरद पवार यांच्या सांगण्यावरून नोकरी सोडून मी राजकारणात प्रेवश केला. प्रारंभी काही अडचणी आल्या, पण पवारांनीच राजकीय बस्तान बसवून दिले. त्यांच्यासोबत कायम राहू शकलो नाही, याची मनात खंत आहे. त्यांच्याही मनात कदाचित ही खंत असेल, असे वाटते. आज आम्ही दोघेही वेगवेगळ्या पक्षात असलो तरीही आमची मैत्री कायम आहे.

हे होते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे, सुनील महाजन आदी उपस्थित होते.

Last Updated : Mar 5, 2022, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.