ETV Bharat / city

पुण्यातील नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात, सात वाहने एकमेकांना धडकली

author img

By

Published : Jul 1, 2020, 6:23 PM IST

याप्रकरणी धीरज देविदास लोखंडे (वय २६) यांनी तक्रार दिली असून, ट्रक चालक दशरत राठोड (वय २४) याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident
पुण्यातील नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात

पुणे - नऱ्हे येथील नवले ब्रिजजवळ आज (बुधवार) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला. सिग्नलवर थांबलेल्या एका गाडीला पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने पुढील पाच वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये सर्व वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार धीरज लोखंडे हे वडिलांना देहू येथे सोडण्यासाठी स्विफ्ट गाडीने जात असताना नवले पुलाजवळ सिग्नल लागल्याने त्यांनी गाडी थांबवली होती. यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून एका नॅनो कारने धडक दिली. लोखंडे यांनी खाली उतरून पाहिले असता एका अवजड ट्रकचालकाने पुढे असणाऱ्या टेम्पोला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर हा टेम्पो वेगाने पुढे गेला आणि नॅनो कार, मारुती वॅग्नर, टेम्पो यासह सात वाहने एकमेकांवर आदळली.

या अपघातात पाच वाहनांचे जबर नुकसान झाले आहे. हयगई करत वाहन चालवल्याप्रकर्णी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे सिंहगड रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विकास मते करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.