ETV Bharat / city

Savitribai Phule Birth Anniversary 2022 : हरी नरके यांनी उलगडला सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट

अठराव्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. (Birth Anniversary of Savitribai Phule 2022) सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून सावित्रीबाई यांना ओळखले जाते. (Life journey of Savitribai Phule) ज्येष्ठ इतिहास अभ्यासक हरी नरके यांनी आपली मत नोंदवली आहेत.

सावित्रीबाई फुले यांची आज जयंती
सावित्रीबाई फुले यांची आज जयंती
author img

By

Published : Jan 3, 2022, 12:38 PM IST

Updated : Jan 3, 2022, 12:51 PM IST

पुणे - ज्या काळात महिलेचे अस्तित्व केवळ चूल आणि मूल इतकच होते त्या काळात सातारा जिल्ह्यातील शिरवळ पासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांच्या घरात क्रांतीज्योतीचा जन्म झाला. (Birth Anniversary of Savitribai Phule) तो दिवस होता 3 जानेवारी अन् साल होत 1831. (Savitribai Phule jayanti 2022) या क्रांतीज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईंचे काम फक्त शिक्षणापूरते मर्यादित नसून सामाजिक स्तरावर सर्वंकश सामावलेले आहे. (Savitribai spent her life in public work with education) तसेच, आयुष्यभर सावित्रीबाई फुले यांनी लोककार्यात आपला देह झिजवला आहे. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ इतिहास अभ्यासक हरी नरके यांनी दिली आहे.

माहिती देताना हरी नरके

अन 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली

इ.स. वी. सन 1840 मध्ये ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. त्यानंतर सावित्रीबाई फुले फुले वाड्यात गेल्या. शेणा मातीनं सारवलेला हा रेखीव वाडा. (Hari Narke Information On Savitribai Phule life) समोरच्या अंगणात असलेली ही विहीर जी ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी खुली केली. हे सगळे सामाजिक बदल त्या काळात त्यांनी घडवून आणले. मात्र, हे सर्व सरळ मार्गाने पार पडले नाही. मोठ्या अडीअडचणींना त्यावेळी तोंड द्यावे लागले. दरम्यान, सावित्रीबाईंना अपत्य होत नव्हते. (Savitribai spent her life in public work with education) याच काळात काही दिवस वाट पाहून सावित्रीबाईंच्या सासर्‍यांनी ज्योतीबांच्या दुसर्‍या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, त्या प्रस्तावाला ज्योतीबांनी तीव्र असा विरोध केला. त्यावेळी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी समाजाचा कुठलाही विचार न करता यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतले. यशवंत आणि त्याच्या विधवा आईला सावित्रीबाईंनी आपल्या घरी आणत प्रेमाने सांभाळही केला. हीच घटना सावित्रीबाईच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष देऊन जाते.

ज्योतिबांनी सावित्रीबाईंचा प्रवेश सरकारी शाळेत घेतला

सावित्रीबाई फुले यांना लहानपणापासूनच शिक्षणाची इच्छा होती. त्या काळची परिस्थिती पाहता सावित्रीबाईंना शिक्षण देणे त्यांच्या कुटुंबीयांना मात्र ते काही शक्य नव्हते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत सावित्रीबाईंचे लग्न झाले आणि त्यानंतर त्यांचा उदार दृष्टिकोन ज्योतिबांना समजला. त्यांनी शिकावे असा ज्योतिबांचा मानस झाला. इथूनच सावित्रीबाईंच्या शिक्षणाची सुरवात झाली. शेतातील काळ्या मातीत सावित्रीबाई अक्षरे गिरवू लागल्या. त्यात प्रगती झाल्यावर ज्योतिबांनी सावित्रीबाईंचा प्रवेश सरकारी शाळेत घेतला. शिक्षण सुरू झाले. आणि तेव्हाच ज्योतिबांनी निश्चित केले होते की मुलींसाठी एक शाळा उभी करायची आणि महिलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे. त्यांना शिक्षण देण्याचे पवित्र काम सावित्रीबाई करतील हे ज्योतिबांनी मनाशी ठरवून घेतले. (1 जानेवारी 1848)रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली गेली. ती ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या भिडे वाड्यात. अशी माहिती यावेळी इतिहास अभ्यासक हरी नरके यांनी दिली.

फक्त स्त्री शिक्षणाची गंगाच घेऊन आल्या नाहीत तर त्यांचा सामाजिक कार्यात तितकाच पुढाकार होता

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यामध्ये 1848 ला मुलींची पहिली शाळा भरवली. मात्र, हा तो काळ होता ज्यावेळी स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे धर्मभ्रष्ट होण असे मानले जायचे. त्यावेळी समाज सुधारणेचे फुले दामपत्याचे काम सुरू होते. त्यांचे शिक्षणाप्रति असलेले प्रेम, चिकाटी आणि मेहनत पाहता 1852 मध्ये इंग्रज सरकारने फुले दाम्पत्याचा मेजर कँडी यांच्या हस्ते जाहीर सत्कार करत शाळांना सरकारी अनुदानही दिले. सावित्रीबाई त्याकाळी फक्त स्त्री शिक्षणाची गंगाच घेऊन आल्या नाहीत तर त्यांचा सामाजिक कार्यात तितकाच पुढाकार होता. असे यावेळी इतिहास अभ्यासक हरी नरके म्हणाले.

प्लेगच्या आजाराने क्रांतीज्योती अनंतात विलीन

1876 ते 77 च्या दुष्काळात सावित्रीबाईंनी खूप कष्ट घेतले. 1896 च्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला आदर्श घालून दिला. पोटासाठी देह विक्री करणार्‍या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. 1896/97 च्या काळात पुणे आणि परिसरात प्लेगची साथ वाढत होती. ही जीवघेणी साथ अनेकांचे जीव घेत होती. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश सरकारने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. या वेळी प्लेगग्रस्थानची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला आणि याच आजारात 10 मार्च 1997 रोजी क्रांतीज्योती अनंतात विलीन झाल्या.

हेही वाचा - Deaf Children Run Hotels In Pune : संपुर्ण हॉटेल चालवतात 'ही' मुलं; पहा हा खास रिपोर्ट

Last Updated : Jan 3, 2022, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.