पुणे - छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून करारपत्र sambhaji raje comment on dipak kesarkar घेणे हे गद्दारी नव्हे का, तसेच छत्रपती संभाजी राजे यांना खासदारकी दिली नाही, हा शिवाजी महाराज यांचा अपमान आहे, असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते sambhaji raje on shiv sena आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर टीका केली होती. यावर माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल मत व्यक्त केले आहे. संभाजी राजे म्हणाले की, माझ्यासाठी तो विषय इतिहास झाला आहे. मी राज्यसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडत असताना मी शिवाजी महाराज यांना स्मरून बोललो आहे. त्यामुळे, मला आत्ता पुढे भाष्य करायचे नाही, अस यावेळी संभाजीराजे म्हणाले.
हेही वाचा Pune Crime डेटिंग ॲपवरून 50 वर्षीय पुरुषाने तरुणीला केले डेट, सोशल मिडियावरची मैत्री पडली महागात
टिळक रस्त्यावर हिराबाग चौकात मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स या इमारतीत उभारण्यात आलेल्या यूथ डेव्हलपमेंट सेंटर स्टुडिओचे उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व माजी खासदार संभाजी राजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संभाजी राजे पुढे म्हणाले की. करार पत्राचा विषय खरा आहे. तसेच मला दिलेला शब्द पाळला नाही हे ही सत्य आहे. पण आत्ता माझ्यासाठी तो विषय पूर्णपणे संपलेला आहे. आणि मला त्या विषयावर काहीही चर्चा करायची नाही. दीपक केसरकर यांनी जे काही विधान केले ते त्यांच्या भावना आहे. मी माझ्या विषयी याआधी स्पष्ट सांगितले आहे. जो काही मला शिवसेनेकडून शब्द देण्यात आला होता तो पाळलेला नाही, पण आत्ता माझ्यासाठी तो विषय पूर्णपणे संपलेला आहे. गौण आहे, असे देखील यावेळी संभाजी राजे म्हणाले.