पुणे - शिंदे-फडणवीस सरकार हे मराठा, बहुजन विरोधी सरकार आहे. त्याचे अनेक पुरावे मी देऊ शकतो. महाविकास आघाडी सरकारने इडब्लूएसच्या सवलती मराठा समाजाला मिळतील, अशी तरतुद केली होती. मात्र, उच्च न्यायालयात शिंदे-फडवणीस सरकारने बाजू निट मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे इडब्लुएस आरक्षण गेले, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी शिंदे-फडवणीस सरकारवर केली ( pravin gaikwad criticized shinde fadnavis government ) आहे.
राज्यातील राजकीय घडामोडी विषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने बैठक आयोजित केली होती. तेव्हा प्रवीण गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. प्रवीण गायकवाड म्हणाले की, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मागणी होती, ती मान्य झाली नाही. केंद्र सरकारने इ़डब्लूसएस दहा टक्के आरक्षण दिलं होते, ते सुद्ध रद्द करण्यात आलं आहे.
'छत्रपती शिवाजी महाराज समाधीचा निधी थांबवला' - वढू-बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकांची मागणी संभाजी ब्रिगेड सातत्याने करत होतो. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने निधी दिला होती. तो निधी देखील शिंदे-फडणवीस सरकारने थांबवला आहे. बारामतीमधील सर्वात मोठी शिवसृष्टीचा निधी देखील सरकारने थांबवला आहे. रायगड प्राधिकरणामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची कामे सुरु आहेत. त्याचा निधी देखील शिंदे सरकारने थांबवल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
'सरकार हिंदू बहुजन मराठा व विरोधी' - भाजप देशात एक अधिकार शाही आणू शकते, त्यांची तशी रणनीती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे आमदार घ्यायचे असंच यांचा कार्यक्रम आहे. हिंदुत्व की हिंदुत्ववाद भारतीय की हिंदुत्ववादी हा एक प्रश्न मोठा आहे. राज ठाकरे म्हणतात दोन्ही प्रश्न मोठा आहे. त्यामुळे हे सरकार आज तरी हिंदू बहुजन मराठा व विरोधी आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड यासाठी जनजागृती करेल, असेही प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray : 'संजय राऊतांना अटक होऊ शकते; महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्याला...'; उद्धव ठाकरेंचा इशारा