मुंबई- सांगली लोसभेची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाच सोडली असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. तर पुण्याबाबत सस्पेन्स कायम ठेवत, उमेदवार आज संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. रावेल लोकसभेसाठी उल्हास पाटीस पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. टिळकभवन येथ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
टिळक भवनात आज काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. पुण्यातून प्रविण गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे. या स्पर्धेत सुरेखा पुणेकर यांचेही नाव चर्चेत आले आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ५ एप्रिलला राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. यावेळीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून उपस्थित होते.