पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे 2018 मध्ये उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. भिडे आणि एकबोटे यांना पुणे पोलिसांनी चार दिवसांसाठी जिल्हाबंदी केली आहे.
हेही वाचा.... लोकबिरादरीची निरंतर सेवा.. आदिवासींमध्ये राहून त्यांच्यासाठी ४६ वर्षांपासून राबतेय आमटे कुटुंब
‘शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संभाजी भिडे आणि ‘हिंदू एकता आघाडी’चे मिलिंद एकबोटे यांना पुण्यात चार दिवसांची जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा... अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाल्या ‘ठाकरे’ नाव लावून...
एकबोटे आणि भिंडे यांच्यासह सर्व १६३ आरोपींना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी 2018 मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून या संबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा... धोकादायक प्रजातीच्या प्राण्यांची तस्करी केल्याबद्दल चेन्नईत एकाला अटक
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विविध पक्ष, संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.