पुणे - सैराट फेम अभिनेता अरबाज शेख याला पुण्यात एका रिक्षावाल्याकडून मनस्ताप सहन करावा लागला असल्याची फेसबुक पोस्ट त्याने केली होती. तर त्या रिक्षावाल्याने आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप देखील अरबाज शेख याने केला होता. त्यांनतर आता ज्या रिक्षावाल्यावर आरोप केले होते त्या असिफ मुल्ला याने समोर येऊन आपली बाजू मांडली आहे. त्याने यावेळी हे आरोप फेटाळले आहेत.
"त्यादिवशी पुण्यात खूप पाऊस होता. मी त्यांना पुणे स्टेशन येथे जाण्यासाठी धायरी फाटा येथून घेतले. त्यादिवशी भिडे पूल वाहतुकीसाठी बंद होता. पण अरबाज शेख पाण्यातून रिक्षा घालण्यासाठी आग्रह करत होते. मात्र त्यासाठी मी नकार दिला. त्यामुळे त्यांना फिरून घेऊन जावं लागलं, मी त्यांना शिवीगाळ अजिबात केली नाही. माझ्यावर ते आरोप करत आहेत." असे असिफ मुल्ला म्हणाले आहेत.
दुसरीकडे, अरबाज शेख यांनी फेसबुक पोस्ट केल्यापासून मला धमक्या येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मी घरच्या बाहेर पडलो नाही. एकतर हातावर पोट त्यात दोन दिवस रिक्षा चालवत नसल्याने मित्रांकडून पैसे घेऊन घर चालवाव लागत असल्याच असिफ ने सांगितलं आहे. मी 8 वर्षांपासून रिक्षा चालवत आहे. मात्र अजूनपर्यंत कोणालाही अपशब्द बोललो नाही. मी अरबाज शेख यांना विनंती करतो तुम्ही सेलेब्रिटी आहात खरे काय ते लोकांना सांगा, असे देखील असिफ म्हणाला आहे.
हेही वाचा - वऱ्हाड निघाले पुरातून; लग्नासाठी पैनगंगेतून 7 KM नवरदेवचा प्रवास; अखेर मुहुर्तावर केले थाटात लग्न