ETV Bharat / city

Petrol Disel Price :...म्हणून भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव होणार स्थिर, अली दारुवालांनी सांगितले 'हे' कारण - भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमती

देशातील सामान्य नागरिकांना महागाईची झळ ( Inflation In India ) बसत असतानाच एकीकडे रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू ( Russia Ukraine War ) झालं, त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. मात्र, रशियाने भारताला पेट्रोलियम उत्पादनांच्या ( Russia Discount On Petroleum Product ) किमतीवर ३०% सूट मिळाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर असल्याचं दिसून येत आहे.

Russia discount To India on Petrol
Russia discount To India on Petrol
author img

By

Published : Mar 19, 2022, 3:50 PM IST

पुणे - देशातील सामान्य नागरिकांना महागाईची झळ ( Inflation In India ) बसत असतानाच एकीकडे रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू ( Russia Ukraine War ) झालं, तर दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आला आणि सगळीकडे एकच बातमी पसरली की यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी ( Petrol Disel Price Hike ) वाढ होणार आहे. पण अस न होता, या उलट सर्व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळला आहे. कारण रशियाने भारताला पेट्रोलियम उत्पादनांच्या ( Russia Discount On Petroleum Product ) किमतीवर ३०% सूट मिळाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर असल्याचं दिसून येत आहे.

रशियाकडून भारताला सूट -

रशियाने क्रूड ऑइल ट्रान्सपोर्ट इन्शुरन्ससाठी विमा प्रीमियम पेमेंटची काळजी देखील घेतली आहे, जी कोविडच्या दिवसांमध्ये कमालीची होती. युद्धासारख्या परिस्थितीने विमा कंपनीला प्रचलित दरांपेक्षा प्रीमियम दर 3 पट वाढविण्यास भाग पाडले होते. एकूण सवलतींमुळे भारताला तेलाच्या किंमती वाढण्यापासून टिकवून ठेवण्यास मोठी मदत झाली आहे. याशिवाय रशियाने आपल्याला घरपोच माल पोहोचवण्याचे आश्वासन दिलं आहे. त्यामुळे अजूनही आपल्याकडे पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर असल्याची माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया

भारतापुढे मोठं संकट -

दरम्यान, या युद्धामुळे भारतापुढे मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्ध परिस्थितीमुळे आंतराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल 93 डॉलर असलेले तेलाचे दर वाढून 100 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे. भारताने 2021मध्ये रशियाकडून 43,400 बीपीडी तेल आयात केले आहे. जो एकूण आयात केलेल्या तेलाच्या 1 टक्के आहे. मात्र, रशियाच्या या निर्णयानंतर थोडा का होईना, भारताला दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - farmers suicides : भाजपच्या सत्ता काळात सुमारे 15 हजार शेतकऱ्यांनी जीवन संपवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.