ETV Bharat / city

भाजपने आरोप असलेल्या कोणालाही पक्षात घेतले नाही; चंद्रकांत पाटलांचा दावा - Chandrakant Patil comment on other parties member

भाजपने आत्तापर्यंत आरोप असलेल्या कोणाला पक्षात घेतले नाही, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Aug 31, 2019, 10:55 AM IST

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिकेतील कामांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील शहरात आले होते. यावेळी त्यांनी भाजपने आत्तापर्यंत आरोप असलेल्या कोणालाही पक्षात घेतले नाही. आरोप असणारा कोणी जर पक्षात आला असेल तर, त्याच्यावरही कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले.

विविध विषयावर मत व्यक्त करताना चंद्रकांत पाटील

पालिकेतील कामाचा आढावा घेतल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना राज्यातील पूरस्थितीची पाहणी करायला आलेल्या केंद्रीय पथकावरील पूरग्रस्तांच्या नाराजी बाबतचा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी केंद्रीय पथक शुक्रवारी पाहणीसाठी आले असले तरी पहिल्या दिवसापासून जिल्हा प्रशासनाने सर्व माहिती घेतली आहे. ही माहिती केंद्रीय पथकाला देणे हाच खरा प्रवास असतो. दुसरी बाब म्हणजे पूर परिसराचे क्षेत्र पाहता कुठे ना कुठे तरी या पथकाला पोहचायला रात्र होणारच, असे म्हणत पथकाची पाठराखण केली.

पूरग्रस्त शंभर गावातील मंदिरे, मुलींचे विवाह, गोबर गॅस प्रकल्प उभारणे, महिलांना कपडे धुण्यासाठी नदीलगत काठ बांधून देणे यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. पण हे आवाहन करून सरकार आपले हात तर वर करत नाही ना? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

Intro:mh_pun_02_chandrakant_patil_avb_mhc10002Body:
mh_pun_02_chandrakant_patil_avb_mhc10002

Anchor:- भारतीय जनता पार्टीने आत्ता पर्यंत आरोप असलेल्या कोणाला पक्ष्यात घेतले नाही. आरोप असणारा कोणी जर आला, तो आल्यामुळे त्याच्यावरील आरोप हे नष्ट झाले, कारवाई होणार नाही असे चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राज्यातील पुरस्थितीची पाहणी करायला आलेल्या केंद्रीय पथकावर पुरग्रस्थांनी नाराजी व्यक्त केली असताना महसूल मंत्री चंद्रकांत यांनी मात्र त्यांची पाठराखण केलीये. पिंपरी चिंचवड महापालिकेतील कामांचा आढावा घ्यायला पहिल्यांदाच पाटील आले होते, तेंव्हा पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. केंद्रीय पथक आज पाहणी साठी आलं असलं तरी पहिल्या दिवसापासून जिल्हा प्रशासनाने सर्व माहिती घेतलीये. तीच माहिती केंद्रीय पथकाला देणं हाच खरा प्रवास असतो. दुसरी बाब म्हणजे पूर परिसराचं क्षेत्र पाहता कुठं ना कुठं तरी या पथकाला पोहचायला रात्र होणारच. असं स्पष्टीकरण पाटीलांनी दिला. तसेच या शंभर गावातील मंदिर, मुलींचे विवाह, गोबर गॅस प्रकल्प उभारणं, महिलांना कपडे धुण्यासाठी नदीलगत काठ बांधून देणं यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन पाटील यांनी केलं. पण हे आवाहन करून सरकार आपले हात तर वर करत नाही ना? असा प्रश्न विचारला जातोय.

बाईट : चंद्रकांत पाटील - महसूल मंत्री Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.